न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाला सलग दुसर्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मालिकेतील दुसर्या सामन्यात न्यूझीलंड संघाने 4 चेंडू आणि 9 गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तान संघाने 164 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य न्यूझीलंड संघाने 19.2 षटकात 1 गडी गमावत पूर्ण केले. या सामन्यात टीम सेफर्टने नाबाद 84 आणि कर्णधार केन विल्यम्सनने नाबाद 57 धावांची खेळी साकारली. पाकिस्तान संघाकडून फहीम अशरफने 1 विकेट घेतली.
पाकिस्तानची फलंदाजीत हाराकिरी
तत्पूर्वी पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पाकिस्तान संघाने दुसर्या षटकात 2 गडी गमावले. टीम साऊदीने हैदर अली (8)आणि शफीक (0) यांना बाद केले त्यानंतर रिजवान(22) टीम साउदीचा तिसरा शिकार ठरला. त्यानंतर कर्णधार शादाब खान(4) ही लवकर बाद झाला.
त्याचबरोबर मोहम्मद हाफिजने एक बाजू लावून धरताना चांगली खेळी केली. त्याने खुशदिल (14) सोबत मिळून पाचव्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आठव्या क्रमांकावर आलेल्या इमाद वसीमने नाबाद 10 धावा केल्या. हाफिजने शेवटपर्यंत फलंदाजी करताना 57 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 99 धावांची खेळी साकारली. त्यामुळे पाकिस्तान संघाने 6 गडी गमावून 163 धावसंख्या उभारली होती.
न्यूझीलंडने सहजपणे पार केले आव्हान
परंतु न्यूझीलंड संघाला 164 धावांचा पाठलाग सहजपणे केला. चौथ्या षटकात मार्टिन गप्टील आपल्या 21 धावांवर बाद झाला. त्याला फहीम अशरफने बाद केले. त्यानंतर टीम सेफर्ट आणि केन विल्यम्सनने पाकिस्तानच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. दोन्ही फलंदाजाने चौकार आणि षटकारांची बरसात केली.
टीम सेफर्टने 63 चेंडूचा सामना करताना 8 चौकार आणि 3 षटकार खेचत नाबाद 84 धावांची खेळी केली. त्याचबरोबर केन विल्यम्सने त्याला योग्य साथ देताना 42 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार खेचत नाबाद 57 धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंड संघाने हा सामना 19.2 षटकात 9 गडी राखून जिंकला.
टीम साउदीची दमदार कामगिरी
या सामन्यात टीमने साउदीने उत्तम गोलंदाजीचा नजारा सादर करताना 4 षटकात 21 धावा दिल्या. त्याने 5.2 च्या इकॉनॉमीने 4 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर पाकिस्तान संघाच्या खेळाडूंना आपल्या तालावर नाचवले. त्याचबरोबर निशम आणि सोधीने प्रत्येकी एक विकेट घेत न्यूझीलंड संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
संबधित बातम्या:
– विलियम्सनचा अपर कट पाहून व्हाल अवाक; व्हिडिओ होतोय व्हायरल
– दुर्दैव! ९९ धावांवर नाबाद राहिल्याने त्या चार कमनशिबी खेळाडूंमध्ये सामील झाला हफिज
– न्यूझीलंड दौऱ्यावरील पाकिस्तानची सुरुवात पराभवाने; पहिल्या टी-२० सामन्यात किवी संघाचा ५ गडी राखून विजय