Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

NZvIND: पहिल्या टी20 मध्ये होणार पावसाचा खेळ? असे आहे वेलिंग्टनचे हवामान

November 17, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Hardik Pandya & Kane Williamson

Photo Courtesy: Twitter/ BLACKCAPS


टी20  विश्वचषकात उपांत्य फेरीतून बाहेर पडलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा शुक्रवारी (18 नोव्हेंबर) सुरू होत आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत बाहेर पडलेल्या या दोन्ही संघांमधील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे खेळला जाईल. मात्र, विजयी सुरुवात करण्याची इच्छा असलेल्या दोन्ही संघांच्या इराद्यावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.

सध्या ऑस्ट्रेलिया खंडात पावसाचे दिवस सुरू आहेत. टी20 विश्वचषकातील अनेक सामन्यांना याचा फटका बसला. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यातही पाऊसच अडथळा ठरू शकतो. भारतात हा सामना दुपारी बारा वाजता सुरू होईल. तर, न्यूझीलंडच्या स्थानिक वेळेनुसार या सामन्याची वेळ सायंकाळी 7.30 आहे.

स्थानिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारी वेलिंग्टनमध्ये पावसाची शक्यता आहे. सकाळी आणि दुपारी पाऊस पडण्याची शक्यता तब्बल 96 टक्के इतकी सांगितली जातेय. तर, सूर्यास्ताच्या वेळी ही शक्यता 76 टक्के आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द होऊ शकतो असे म्हटले जातेय.

भारतीय संघाला या दौऱ्यावर तीन टी20 व तीन वनडे सामने खेळायचे आहेत. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ 18, 20 व 22 नोव्हेंबर रोजी टी20 मालिका खेळेल. तर, वनडे मालिकेत शिखर धवन संघाचे नेतृत्व करेल. भारतीय संघाने मागील वेळी न्यूझीलंडमध्ये खेळलेल्या टी20 मालिकेत 5-0 असा विजय मिळवला होता. यावेळी नियमित कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल व विराट कोहली यांना या मालिकेसाठी विश्रांती दिली गेली आहे.

टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-

हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, भुवनेश्वर कुमार अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव व हर्षल पटेल.

(NZvIND 1st T20I Weather Forecast )

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ खेळाडूला डावलणे सीएसकेला महागात पडणार! विजय हजारे ट्रॉफीत कुटले सलग तिसरे शतक
उत्तराखंडमधील नीब करोरी बाबाच्या दर्शनाला पोहोचला विराट, चाहत्यांसोबतचे फोटो व्हायरल 


Next Post
Photo Courtesy: Twitter/BCCI

हार्दिक आणि वीवीएस लक्ष्मणकडून फलंदाजांना मिळाला 'हा' सल्ला, प्रशिक्षकांनी स्वतः दिली माहिती

fOOTBALL

ओडिशा एफसीला विजयपथावर परतायचे आहे, पण समोर ईस्ट बंगाल एफसीचे तगडे आव्हान

india-test-team

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेआधी बीसीसीआयने आखली नवी योजना; 'त्या'दोघांना मिळू शकते जबाबदारी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143