न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळाली. अर्शदीप या सामन्यात संघासाठी महागात पडला, पण उमरान मलिकने मात्र दोन विकेट्स घेतल्या. भारताने हा सामना 7 विकेट्स गमावला. असे असले तरी, भारताचा माजी सलामीवीर आणि जाणकार वसीम जाफर याच्याकडून उमरान मलिक आणि अर्शदीपला कौतुकाची थाप मिळाली आहे.
वसीम जाफरच्या मते उमरान मलिक (Umran malik) टी-20 पेक्षा एकदिवसीय फॉरमॅटमध्ये चांगले प्रदर्शन करू शकतो. तर अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) भविष्यात या फॉरमॅटमध्ये चांगले प्रदर्शन करेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. माध्यामांशी बोलताना वसीम जाफर (Wasim Jaffer) म्हणाला की, “हा प्रकार (एकदिवसीय) उमरान मलिकला टी-20 प्रकारापेक्षा जास्त अनुकूल असेल. आपण आयपीएलमध्ये पाहिले आहे, या प्रकाराएवढी त्याठाकाणी विविधता नाहीये. याठिकाणी तो शॉर्ट चेंडूचा योग्य वापर करू शकतो. अर्शदीपला फॉरमॅटची सवय होऊन जाईल. तो एक गुणवंत फलंदाज आहे आणि लवकरच याठिकाणी रुळेल देखील.”
जाफर पुढे बोलताना म्हणाला की, “दोन्ही पदार्पण करणाऱ्या खेळाडूंकडून खूप जास्त अपेक्षा असतील. मलिकने काही विकेट्स घेतल्या आणि काही ठिकाणी विरोधकांसाठी तो घातक असल्याचे दिसले. मी मागच्या काही काळापासून अर्शदीप सिंगला पाहत आहे, तो खूप गुणवंत गोलंदाज आहे. भविष्यात तो भारतासाठी महत्वाचा खेळाडू होऊ शकतो. फक्त या विश्वचषकातच नाही, तर आगामी विश्वचषकात देखील.”
दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यामुळे त्यांना प्रथम फलंदाजी करावी लागली. मर्यादित 50 षटकांमध्ये भारताने 7 विकेट्सच्या नुकसानावर 306 धावा केल्या. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 47.1 षटकात 3 विकेट्स गमावून विजय मिळवला. टॉम लॅथम सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला, ज्याने न्यूझीलंडसाठी नाबाद 145 धावा कुटल्या. त्याचसोबत त्यांचा कर्णधार केन विलियन्सम देखील 94 धावा करून शेवटपर्यंत नाबाद राहिला. (ODI cricket is better than T20 for Umran Malik! Advice from an Indian veteran)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकणाऱ्या भारतीयाने घेतली पाकिस्तानी खेळाडूची भेट, दिला मैत्रीचा संदेश
अय्यरने केली टीकाकारांची बोलती बंद! म्हणाला, ‘आता काय थेट टी20 मोडमध्ये…’