भारत आणि श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना कोलंबो मैदानावर खेळला गेला. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा उपकर्णधार शुबमन गिलनं (Shubman Gill) बाऊंड्रीवर क्षेत्ररक्षण करताना कुसल मेंडिसचा झेल घेतला आणि पंचांनी मेंडिसला बाद दिलं. त्यामुळे खूप चर्चा निर्माण झाल्या आहेत की, तो झेल क्लिअर होता का? गिलनं झेल घेतलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याचा पाय बाऊंड्रीच्या दोरीला लागलेला दिसत आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
शेवटच्या 3 षटकात कुसल मेंडिस धमाकेदार फलंदाजी करत होता. त्यानं 4 चौकारांच्या मदतीनं 59 धावा केल्या. एका बाजूनं श्रीलंकन खेळाडू बाद होत असताना मेंडिसनं एक बाजू लढवून धरली होती. एकवेळी अस वाटत होतं की श्रीलंका संघ खूप मोठ्या धावसंख्येवर्यंत पोहोचेल पण मेंडिस बाद झाल्यानंतर श्रीलंकेची धावसंख्या स्थगित झाली. 49व्या षटकात फिरकीपटू कुलदीप यादवच्या चेंडूवर षटकार ठोकण्याच्या नादात मेंडिस बाद झाला. बाउंड्रीवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या गिलनं त्याचा झेल घेतला.
Kusal Mendis given out by the umpire: Pictures show Shubman Gill touching the rope ? pic.twitter.com/hP8dGd2vOQ
— Azzam Ameen (@AzzamAmeen) August 7, 2024
गिलनं घेतलेल्या झेलचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे की, कुसल मेंडिस हा बाद नव्हता तो षटकार होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोच्या अँगलमध्ये गिलचा पाय बाउँड्री लागलेला दिसत आहे. तो अँगल पंचांनी का दाखवला नाही असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“विनेश फोगटला रौप्य पदक देण्यात यावं”, दिग्गज अमेरिकन कुस्तीपटूची नियमांमध्ये बदल करण्याची मागणी
पॅरिस ऑलिम्पिक: टेबल टेनिसमध्ये भारताच्या हाती निराशा, उपांत्यपूर्व फेरीत दारूण पराभव
जेव्हा विनेशप्रमाणेच अडकली होती मेरी कोम, अवघ्या 4 तासांत कमी केलं होतं 2 किलो वजन!