शुक्रवारी (13 जानेवारी) भुवनेश्वर येथे हॉकी विश्वचषकाचे बिगूल वाजणार आहे. 16 संघ हा विश्वचषक जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतील. भारताने अखेरच्या वेळी 1975 मध्ये विश्वचषक उंचावला होता. त्यानंतर भारतीय संघ उपांत्य फेरीत देखील प्रवेश करू शकला नाही. मात्र, यावेळी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाकडून सर्वांना अपेक्षा आहेत. भारताने या विश्वचषकात विजय मिळवल्यास त्यांच्यावर कोट्यावधी रुपयांच्या बक्षिसांची खैरात होणार आहे.
सलग दुसऱ्यांदा ओडिशा येथे हॉकी विश्वचषकाचे आयोजन होत आहे. भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम व राऊरकेला येथील शहीद बिरसा मुंडा स्टेडियमवर हा विश्वचषक पार पडेल. 29 जानेवारी रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. बुधवारी (11 जानेवारी) स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी ओडिशा सरकार व हॉकी इंडिया यांच्याकडून भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या बक्षिसाच्या रकमेची घोषणा केली गेली.
The success behind Men’s Hockey India summoned in a picture.🙌🏻#IndiaKaGame #HockeyIndia #HWC2023 #StarsBecomeLegends @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI @FIH_Hockey pic.twitter.com/GNJqITP5pF
— Hockey India (@TheHockeyIndia) January 12, 2023
मागील अनेक वर्षापासून भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघाला प्रायोजित करणाऱ्या ओडिशा सरकार व मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी, भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यास प्रत्येक खेळाडूला एक कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. त्याचबरोबर हॉकी इंडिया भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकल्यास प्रत्येकी 25 लक्ष रुपये देणार असल्याची माहिती हॉकी इंडियाचे प्रमुख दिलीप तिर्की यांनी केली. तर रौप्य पदक जिंकल्यास 15 लक्ष व कांस्य पदक जिंकल्यास 10 लक्ष रुपये हॉकी इंडियातर्फे देण्यात येतील.
सध्या भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. 2021 टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताने 1980 नंतर प्रथमच कांस्य पदक आपल्या नावे केलेले. तर, एफआयएच हॉकी प्रो लीगमध्ये संघाने तिसरे स्थान मिळवलेले.
(Odisha CM Navin Patnaik Announced 1 Crore Each For Indin Hockey Team After Winning 2023 Hockey World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीला हटवून विराटल हवी होती टीम इंडियाची कॅप्टन्सी! माजी प्रशिक्षकाच्या दाव्याने खळबळ
‘जय शाह सर…’, रणजीमध्ये विक्रमी खेळी केल्यानंतर पृथ्वी शॉचा बीसीसीआय सचिवांना रिप्लाय