पुणे: फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज चॅम्पियनशीप सिरीज 18वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या ओजस दबस, जय दीक्षित यांनी तर, मुलींच्या गटात काव्या देशमुख, सहना कमलाकन्नन या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आजचा दिवस गाजवला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या बिगरमानांकित ओजस दबस याने अव्वल मानांकित प्रणव कोरडेचा 6-4, 6-3 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. जय दीक्षित याने तिसऱ्या मानांकित अर्जुन अभ्यंकरचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला.
मुलींच्या गटात लकी लुझर ठरलेल्या पुण्याच्या काव्या देशमुखने पाचव्या मानांकित ईश्वरी मार्कंडेचा 5-7, 6-2, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्राच्या सहना कमलाकन्ननने तिसऱ्या मानांकित गुजरातच्या धनवी काळेचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 7-6(5) असा पराभव करून उदघाटनाचा दिवस गाजवला. क्वालिफायर प्रिशा शिंदेने भावना अगरवालचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला.
याआधी स्पर्धेचे उदघाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जीबीआर समितीचे उपाध्यक्ष महेश आठवले, फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ.आरजी परदेशी आणि क्रीडा संचालक प्रोफेसर गौतम सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नंदन बाळ, संग्राम चाफेकर आणि एआयटीए सुपरवायझर सेजल केनिया आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी): मुले:
ओजस दबस(महा)वि.वि.प्रणव कोरडे(महा)[1] 6-4, 6-3;
जय दीक्षित(महा)वि.वि.अर्जुन अभ्यंकर(महा)[3] 6-3, 6-2;
अनमोल नागपुरे(महा)[4] वि.वि.अभिराम निलाखे(महा) 6-3, 4-6, 6-4;
आर्यन कोटस्थाने(महा)[5] वि.वि.लक्ष्य गुजराती(महा)6-3, 6-2;
सिद्धार्थ मराठे(महा)वि.वि.राधेय शहाणे(महा)6-3, 6-0;
तनिष्क जाधव(महा)[6]वि.वि.वेद ठाकूर(महा)6-1, 6-1;
निशीत रहाणे(महा)[7] वि.वि.मनन चिंतनीया 6-4, 6-3;
राघव अमीन(महा)वि.वि.ओमकार शिंदे(महा) 7-6(1), 6-3;
अनिश रांजळकर(महा)[8]वि.वि.बलवीर सिंग(महा)6-0, 6-0;
मुली:
जेएस साई श्रीया(कर्नाटक)[1]वि.वि.यगमासेनी चक्रवर्ती6-0, 6-0;
दुर्गा बिराजदार(महा)वि.वि.आरझु ठक्कर(महा)6-3, 6-1;
हिया मेहता(तेलंगणा)वि.वि.वैष्णवी चौहान(महा)6-1, 6-2;
काव्या देशमुख(महा)वि.वि.ईश्वरी मार्कंडे(महा)[5] 5-7, 6-2, 6-2;
सहना कमलाकन्नन(महा)वि.वि.धनवी काळे(गुजरात)[3] 7-6(4), 7-6(5);
प्रिशा शिंदे(महा)वि.वि.भावना अगरवाल(महा)6-0, 6-0;
अस्मि आडकर(महा)[6] वि.वि.वृशिता समथकुमार 6-2, 6-0.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अनुभवी असूनही ब्रावोने २ वेळा क्रिज बाहेर फेकला चेंडू, मग अंपायरनेही दिला जशास तसा निर्णय
नया है यह! लाईव्ह सामन्यात फेस प्रोटेक्शन घालून रिशी धवनने केली गोलंदाजी, पण का? जाणून घ्या कारण
सलग ८ पराभवांनंतर रोहित शर्माचे तुटले हृदय, केले भावूक ट्वीट; चाहत्यांचेही मानले आभार