---Advertisement---

राशिद खान अफगाणिस्तानचा हिरो आहे, आम्ही त्याला भारताला देणार नाही

On: शनिवार, मे 26, 2018 1:22 PM
---Advertisement---

शुक्रवारी ईडन गार्डन स्टेडियमवर पार पडलेल्या आयपीएल २०१८च्या क्वालिफायर २ सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकातावर १४ धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

आज हैद्राबादकडून रशीद खानने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करताना हैद्राबादच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्याने आज फलंदाजी करताना १० चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. तर गोलंदाजी करताना १९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

यामुळे भारतीय चाहत्यांनी राशिदला भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विटरवर टॅग करत ही मागणी सोशल मीडियावरही केली.

https://twitter.com/akash_d21/status/1000059781233627136?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fwww.timesnownews.com%2Fsports%2Fcricket%2Fipl%2Farticle%2Fkolkata-knight-riders-vs-sunrisers-hyderabad-2018-qualifier-2-kkr-vs-srh-sushma-swaraj-responds-to-fans-asking-indian-citizenship-for-rashid-khan%2F232202&tfw_creator=TimesNow&tfw_site=TimesNow

यामुळे स्वराज यांनी ट्विट करत चाहत्यांच्या ट्विटला उत्तर दिले. नंतर हे ट्विट डिलिट करण्यात आले.

 

यानंतर अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घणी यांनीही ट्विट करत राशिदच्या कामगिरीचे कौतुक केले.

“आम्हाला राशिदचा अभिमान वाटतो. मी भारतीयांचे आभारी आहे की त्यांनी आमच्या खेळाडूंना भारतात खेळण्याची संधी दिली तसेच त्यांचे कोशल्य दाखवला मोठा प्लॅटफाॅर्म दिला. राशिदने अफगाणिस्तानमधील चांगल्या गोष्टींच्या आठवणी दिल्या. तो क्रिकेट जगतातील एक ठेवा आहे. आम्ही आमच्या हिरोला कुणालाही देणार नाही.” असे ते गमतीने आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

https://twitter.com/ashrafghani/status/1000091172184952832

महत्त्वाच्या बातम्या-

मोठा खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर

कोणते संघ किती वेळा गेले आहेत आयपीएल फायनलमध्ये?

जे आयपीएल २०१७मध्ये झालं तेच २०१८मध्ये होणार का?

बापरे! कालच्या सामन्यानंतर एवढं कौतुक आलं राशीदच्या वाट्याला

अखेर आयपीएलला मिळाला दुसरा सुपरमॅन, केला असा काही कारनामा की ऐकतच रहाल!

ना वार्न- ना मुरली, सचिन म्हणतो हा आहे जगातील सर्वोत्तम गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment