आयर्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यावेळी ऑली पोपने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. ऑली पोप हा इंग्लंडच्या भूमीवर सर्वात जलद द्विशतक झळकावणारा फलंदाज ठरला. इंग्लंडच्या पहिल्या डावात पोपने 207 चेंडूत आपले द्विशतक ठोकले आहे. हे इंग्लंडमधील कोणत्याही फलंदाजाचे सर्वात जलद द्विशतक आहे. तसेच, पोपने 207 चेंडूत द्विशतक बनवत हा पराक्रम आपल्या नावावर केला.
पोपच्या (Ollie Pope) कामगिरी बद्दल सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. तर, पोपच्या आधी हा रेकॉर्ड इंग्लंडचा इयान बोथमच्या (Ian Botham) नावी होता. बोथमने 1982 साली कसोटी सामन्यादरम्यान 220 चेंडूमध्ये आपले द्विशत पुर्ण केले होते. तर इंग्लंडमध्ये खेळताना गार्डन ग्रीनिजने (Garden Greenies) 1984 मध्ये 232 चेंडूवर आपले द्विशतक पुर्ण केले. या दोघांचा रेकॉर्ड मोडीत काढत पोपने आपला नवीन रेकॉर्ड उभा केला आहे. पोपने 207 चेंडूत 205 धावांची खेळी केली. तर बेन डकेटने 178 चेंडूत 182 धावा केल्या. इंग्लंडने पहिल्या डावात 524 धावा करून डाव घोषित केला. (Test match)
कमी डावात जास्त धावा करणारा पोप
तसेच, डकेट आणि पोप यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 252 धावांची भागीदारी केली. दुसरीकडे, आयर्लंडने पहिल्या डावात 172 धावा केल्या. समोर येईपर्यंत आयर्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 3 बाद 97 धावा केल्या होत्या. आयर्लंडचा संघ इंग्लंडपेक्षा 255 धावांनी मागे आहे. कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतकाबद्दल (double century) बोलायचे झाले तर न्यूझीलंडच्या नॅथन अॅस्टलने (Nathan Astle) 153 चेंडूत द्विशतक झळकावण्याची अप्रतिम कामगिरी केली.
दुसरीकडे, पोपचे हे द्विशतक कसोटी क्रिकेटमधील 7 वे सर्वांत वेगवान द्विशतक आहे. पोपच्या द्विशतकाशिवाय जो रुटने 56 धावांची शानदार खेळी खेळली आहे. या खेळीच्या जोरावर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या 11000 धावाही पूर्ण केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
अजिंक्य रहाणेला कठीण काळात मिळाली ‘या’ लोकांची साथ, भारतीय संघातील पुनरागमनामुळे दिग्गज इमोशनल
Big Breaking: WTC फायनलपूर्वीच वॉर्नरची घोषणा, ‘या’ सामन्यानंतर कसोटी क्रिकेटला ठोकणार रामराम