---Advertisement---

पहिला सामना खेळत असलेल्या रॉबिन्सनची कारकीर्द धोक्यात? आठ वर्षांपूर्वीच्या ट्विटने आला अडचणीत

---Advertisement---

इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन लॉर्ड्समध्ये पदार्पण केल्यानंतर वादाच्या भोवर्यात सापडला आहे. न्यूझीलंडविरुद्ध रॉबिन्सनने पहिल्या डावात इंग्लंडसाठी सर्वात्तम गोलंदाजी करत ७५ धावांत चार गडी बाद केले. मात्र, आता रॉबिन्सनच्या गोलंदाजीऐवजी त्याच्या ८ वर्षाच्या ट्विटमूळे गोंधळ उडाला आहे.

या गोलंदाजाने सन २०१२-२०१३ मध्ये अनेक वर्णद्वेषी आणि लैंगिकतावादी ट्वीट केले होते, ज्यावर सर्वत्र टीका होत आहे. याच कारणाने दुसर्‍या कसोटीतून रॉबिन्सनला वगळले जाऊ शकते. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) या विषयावर अत्यंत संवेदनशील आहे आणि त्यावर कडक कारवाई करण्यास तयार आहे.

केले होते असे ट्विट्स
‘द टेलीग्राफ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार रॉबिन्सनच्या वर्तनाविरोधात मंडळाने तपास सुरू केला आहे. रॉबिन्सनला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळले जाऊ शकते. रॉबिन्सन याने आपल्या जुन्या ट्विटमध्ये काही शब्दांचा वापर करून विशिष्ट धर्मातील लोकांचा दहशतवादाशी संबंधित असल्याचे म्हटले होते.

इतकेच नाही तर महिला आणि आशियाई वंशाच्या लोकांवरही अपमानास्पद भाष्य केले गेले. लॉर्ड्स कसोटीतून पदार्पण होताच त्याचे जुने ट्विट व्हायरल झाले. त्यानंतर रॉबिन्सनने ड्रेसिंग रूममध्ये सहकारी खेळाडूंसमोर माफी मागितली.

न्यूझीलंड विरुद्ध लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस संपल्यानंतर थोड्याच वेळात रॉबिन्सन याने एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटले आहे की,
‘माझ्या कारकीर्दीतील सर्वात मोठ्या दिवशी मी ८ वर्षांपूर्वी पोस्ट केलेल्या वर्णद्वेषी आणि लैंगिकतावादी ट्विटसची लाज वाटते. मला हे स्पष्ट करायचं आहे की, मी वर्णद्वेषी किंवा लिंगवादी नाही. मला माझ्या कृत्याचा पश्चात्ताप आहे. जर माझ्या कृतीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर, मी बिनशर्त माफी मागतो. मी विचार न करता बेजबाबदारपणे वागलो. माझी कृती क्षमा करण्यासारखी नाही. त्यावेळी मी तितकासा समजूतदार नव्हतो. मी दिलगिरी व्यक्त करतो.’ मात्र, ईसीबी त्याला माफ करू इच्छित नाही.

पहिला सामना खेळत आहे रॉबिन्सन
सध्या २७ वर्षाचा असलेला ओली रॉबिन्सन न्यूझीलंड विरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळत आहे. २०१३ मध्ये यॉर्कशायरसाठी प्रथमश्रेणी पदार्पण केल्यानंतर त्याने हॅम्पशायरचेही प्रतिनिधित्व केले. २०१५ पासून तो ससेक्स संघाचा भाग आहे. त्याने आत्तापर्यंत ६३ प्रथमश्रेणी सामने खेळताना २७९ बळी मिळवले आहे. सोबतच १ शतक व ७ अर्धशतके देखील आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘या’ खेळाडूकडून धोनी घेतो नेतृत्व करताना सल्ला, ऋतुराज गायकवाडने सांगितले नाव

विश्वचषकात धोनी रन-आऊट झाला तेव्हा ‘अशी’ होती न्यूझीलंडच्या खेळाडूंची प्रतिक्रिया, निशामने केला खुलासा

राशीद खान करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री? पाहा काय दिलं उत्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---