---Advertisement---

पहिल्या टी२०त ओमानचा मुंबईला धोबीपछाड, २ विकेट्सने जिंकला सामना

On: गुरूवार, ऑगस्ट 26, 2021 11:58 AM
---Advertisement---

आगामी टी२० विश्वचषकासाठी ओमानचा संघ तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर ओमानचा संघ मुंबईच्या संघासोबत ३ सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेत ओमानने चांगली सुरूवात केली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ओमानने मुंबईच्या संघाला मात दिली आहे. त्यांनी हा सामना २ विकेट्सने जिंकला आहे. मुंबईने या सामन्यात ९ विकेट गमावत १३१ धावा केल्या होत्या. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत ओमानने ८ विकेट गमावत १३३ धावा करत सामना जिंकला.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या फलंदाजांनी महत्वपूर्ण खेळी केली. त्यांनी प्रत्येकी थोड्या-थोड्या धावा केल्या. मात्र, त्यांची ही खेळी संघासाठी महत्वाची ठरली. सर्वात महत्वाचा फलंदाज ठरलेला आकर्षित गोमेलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने या सामन्यात ३१ चेंडूत ३३ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त हार्दिक तमोरने १४ चेंडूत २३ धावा केल्या. शम्सा मुलानीने १९ धावा केल्या. खेळाडूंच्या या प्रदर्शनाच्या जोरावर मुंबईच्या संघाने ९ विकेटवर १३१ धावा केल्या. ओमानसाठी मोहम्मद नदीनने ३ आणि जीशान मकसूदने २ विकेट घेतल्या. कलिमुल्लाहने संघासाठी २ विकेट मिळवल्या.

ओमानच्या संघाला फलंदाजी करताना एकापाठोपाठ एक झटके लागत राहीले. मात्र, जीशान मकसूदने फलंदाजीतही चांगली खेळी केली. त्याने फलंदाजी करताना संघासाठी अर्धशतक झळकावले. त्याने हे अर्धशतक ३९ चेंडूत केले. नसीम खुशीने तुफानी फलंदाजी करत १२ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या. या २ फलंदाजांमुळे ओमानच्या संघाने ९ चेंडू आणि २ विकेट राखत सामना जिंकला. मुंबईसाठी शशांक अत्रादेने २ आणि मोहित अवस्थीने २ विकेट मिळवल्या. शम्स मुलानीला या सामन्यात २ विकेट मिळाल्या आहेत.

तीन सामन्यांच्या या टी ० मालिकेत ओमनच्या संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. मलिकेतील राहिलेले दोन सामने २६ आणि २७ ऑगस्टला खेळले जाणार आहेत. टी२० विश्वचषकाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ओमानने मुंबईसोबत या मालिकेचे आयोजन केले आहे. मुंबईचा संघ ही मालिका खेळण्यासाठी ओमानमध्ये गेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहितमुळे भारताच्या नावे लाजिरवाणा विक्रम! १ धाव जास्त केली असती तर झाला नसता ‘नकोसा’ विक्रम

निंदनीय..! कोहली बाद होऊन मैदान सोडताना इंग्लंडच्या चाहत्यांनी हात दाखवत केलं ‘असं’ काही

भारत ७८ वर ऑल आऊट, चिंता नको! ही बातमी वाचून भारतीय चाहत्यांच्या जिवात जीव येईल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---