वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल नेहमीच त्याच्या ताबडतोड आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने त्याच्या या फलंदाजी शैलीने टी२० क्रिकेटमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. पण असे असले तरी त्याच्या टी२० क्रिकेटच्या कामगिरीपुढे त्याची कसोटी कारकिर्द मात्र काहीशी झाकोळली जाते. पण ज्याप्रमाणे गेलने टी२० क्रिकेटमध्ये नवनवीन शिखरे गाठली आहेत. त्याचप्रमाणे त्याने कसोटी क्रिकेटमध्येही अनेक मोठे विक्रम केले आहेत. १०० कसोटी सामने खेळणाऱ्या काही मोजक्याच क्रिकेटपटूंमध्ये गेलचाही समावेश आहे. त्याने १०३ कसोटी सामने खेळताना १५ शतके आणि ३७ अर्धशतकांसह ७२१४ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे यात त्याच्या २ त्रिशतकांचा समावेश आहे.
गेलने पहिले त्रिशतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सन २००५ मध्ये केले होते. त्यावेळी त्याने ३१७ धावांची खेळी केली होती. तर दुसरे त्रिशतक त्याने १० वर्षांपूर्वी १६ नोव्हेंबर २०१० ला श्रीलंकेविरुद्ध केले होते. वेस्ट इंडिजकडून पहिल्या डावात केलेल्या त्या त्रिशतकी खेळीत त्याने ४३७ चेंडूंचा सामना करताना ३४ चौकार आणि ९ षटकार ठोकत ३३३ धावा केल्या होत्या. त्या डावात त्याच्याव्यतिरिक्त वेस्ट इंडिजच्या कोणत्याच फलंदाजाला शतकही करता आले नव्हते.
त्यापूर्वी असा कारनामा केवळ वॅली हेमंड यांनी केला होता. त्यांनी १९३३ ला न्यूझीलंड विरुद्ध खेळताना इंग्लंडकडून पहिल्या डावात ३१८ चेंडूत ३३६ धावा केल्या होत्या. त्यावेळी देखील इंग्लंडच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला शतकी खेळी करता आली नव्हती.
गेल २ त्रिशतके करणारा चौथा फलंदाज –
गेलने १६ नोव्हेंबर २०१० ला जेव्हा कसोटी क्रिकेटमध्ये ३३३ धावांची खेळी केली, तेव्हा तो कसोटीत २ त्रिशतके करणारा चौथा क्रिकेटपटू ठरला होता. विशेष म्हणजे त्याच्यानंतर आत्तापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला २ वेळा त्रिशतके करता आलेली नाही. त्यामुळे कसोटीत २ त्रिशतके करणारे आत्तापर्यंत केवळ चारच क्रिकेटपटू आहेत. त्यातील अन्य ३ क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊ.
कसोटी क्रिकेटमध्ये गेलच्या आधी २ त्रिशतके करणारे क्रिकेटपटू –
३. विरेंद्र सेहवाग –
भारताचा धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवागने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा विक्रम म्हणजे २ त्रिशतकांचा. सेहवागने कसोटीतील पहिले त्रिशतक मार्च २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध केले होते. त्यावेळी त्याने मुल्तान येथे खेळताना ३०९ धावांची खेळी केली होती. तर दुसरे द्विशतक त्याने मार्च २००८ ला चेन्नई येथे दक्षिण आफ्रिेकेविरुद्ध केले होते.
२. ब्रायन लारा –
वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या खेळी केल्या. त्यात २ अविस्मरणीय कसोटीतील खेळींचाही समावेश आहे. लाराने एप्रिल १९९४ ला अँटिंग्वा येथे इंग्लंडविरुद्ध ३७५ धावांची ताबडतोड खेळी केली होती. त्यावेळी तो कसोटीत सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा फलंदाज बनला होता. त्यानंतर १० वर्षांनी पुन्हा त्यानेच त्याच्या ३७५ धावांच्या विक्रमाला मागे टाकले. त्याने एप्रिल २००४ मध्ये इंग्लंड विरुद्ध अँटिग्वा येथेच इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी नाबाद ४०० धावांची खेळी केली. आजही या विक्रमाला कोणी धक्का लावू शकलेले नाही.
१. डॉन ब्रॅडमन –
क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक म्हणजे डॉन ब्रॅडमन ९९.९६ ची सरासरी असलेल्या ब्रॅडमन यांनीच कसोटी क्रिकेटमध्ये २ त्रिशतके करणारा पहिला फलंदाज होण्याचा मानही मिळवला होता. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील पहिले त्रिशतक जूलै १९३० ला इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे केले होते. त्यावेळी त्यांनी ३३४ धावांची खेळी केली होती. तर त्यानंतर जूलै १९३४ ला त्यांनी लीड्स येथेच इंग्लंडविरुद्ध ३०४ धावांची खेळी करत दुसऱ्यांदा त्रिशतक करण्याचा कारनामा केला होता.
ट्रेंडिंग लेख –
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
‘डेमियन फ्लेमिंग’… पहाट स्वप्न सत्यात उतरलेले पाहिलेला ऑसींचा एकमेव गोलंदाज
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या कसोटीत ‘हा’ खेळाडू वॉर्नरसह येणार सलामीला? ऑस्ट्रेलियन कर्णधाराने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरणार अनवाणी पायांनी; कारण आहे खूपच कौतुकास्पद
वनडे मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला धक्का; ‘या’ प्रमुख खेळाडूचे खेळणे अनिश्चित