भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेदरम्यान आर अश्विनने अचानक निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर अश्विनने पत्रकार परिषदेत येऊन निवृत्ती जाहीर केली. त्याने ही मालिका संपेपर्यंत थांबले नाही. बाकीच्या दोन सामन्यांमध्ये संधी मिळणार नसल्याचा संकेत अश्विनला मिळाला असावा. त्यामुळे तिसऱ्या कसोटीनंतरच त्याने हा निर्णय घेतला. पण नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये अश्विन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येण्यास तयार नसल्याचे बोलले जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या 0-3 अशा पराभवानंतर अश्विनच्या मनात निवृत्तीचा विचार होता. त्यामुळे तो प्लेइंग इलेव्हनची हमी घेऊन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी अश्विन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यास उत्सुक नव्हता. 106 कसोटी सामन्यांमध्ये 537 विकेट्स घेऊन आपली कारकीर्द संपवणाऱ्या अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेपर्यंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे नव्हते. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीनपैकी दोन सामन्यात बाहेर बसल्यानंतर हा धक्कादायक निर्णय घेण्यात आला.
रिपोर्टनुसार, न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत भारताचा 0-3 असा पराभव झाल्यानंतर अश्विनच्या मनात निवृत्तीचा विचार आल्याचे मानले जात आहे. अनुभवी ऑफस्पिनरने संघ व्यवस्थापनाला सांगितले होते की जोपर्यंत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार याची हमी मिळत नाही तोपर्यंत तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार नाही.
पर्थ कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्याचा भारताचा निर्णय निर्णायक ठरला. रोहित शर्माच्या विनंतीनुसार ॲडलेडमधील पिंक बॉल कसोटीत अश्विनने पुनरागमन केले असले तरी या अनुभवी खेळाडूला त्या कसोटीत आपली छाप सोडता आली नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजाला संधी मिळाली.
गाबा येथील तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर रोहितने म्हटल्याप्रमाणे मेलबर्न आणि सिडनी येथे होणाऱ्या अंतिम सामन्यांसाठी संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे या मालिकेच्या मध्यावर अश्विनने निवृत्ती जाहीर केली.
हेही वाचा-
भारताचा WTC फायनलचा मार्ग खडतर, पाहा अंतिम फेरीसाठी टीम इंडियाला काय करावं लागेल?
या वर्ल्ड रेकाॅर्डवर स्मृती मानधनाच्या नजरा, वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात इतिहास रचणार
BGT 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, टॉप-5 मध्ये 2 भारतीय