---Advertisement---

Video: १४ वर्षांपूर्वी गिब्सने सलग ६ षटकार मारत रचला होता इतिहास; आजही ‘हा’ विक्रम त्याच्याच नावावर कायम

On: मंगळवार, मार्च 16, 2021 7:19 PM
---Advertisement---

क्रिकेटमधील अत्यंत क्वचित घडणाऱ्या विक्रमांपैकी एक विक्रम म्हणजे सलग ६ चेंडूत ६ षटकार मारणे. आत्तापर्यंत काही मोजक्याच क्रिकेटपटूंना सलग ६ चेंडूत ६ षटकार मारता आले आहेत. त्यातही केवळ ३ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा कारनामा करता आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा कारनामा सर्वात पहिल्यांदा केला तो दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू हर्षेल गिब्सने. आज (१६ मार्च) या विक्रमाला १४ वर्षे पूर्ण होत आहेत.

हर्षल गिब्लने २००७ सालच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेकडून नेदरलँड्सविरुद्ध खेळताना हा कारनामा केला होता. त्यावेळी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ६ चेंडूत सलग ६ षटकार मारण्याचा इतिहास आपल्या नावावर नोंदवून घेतला होता. तसेच आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये सलग ६ चेंडूत ६ षटकार मारणारा अजूनही तो एकमेव क्रिकेटपटू आहे.

त्याने डॅन वॅन बंगो हा गोलंदाज जेव्हा डावातील ३० वे षटक टाकत होता तेव्हा हा कारनामा केला होता. त्यावेळी ३० चेंडूत ३२ धावांवर खेळणाऱ्या गिब्जच्या ३० व्या षटकाच्या शेवटी ३६ चेंडूत ६८ धावा झाल्या होत्या.

त्याने या षटकातील पहिल्या चेंडूवर लाँग ऑनला, दुसऱ्या चेंडू लाँग ऑफला षटकार मारला. तर बंगोने फ्लाईट दिलेल्या तिसऱ्या चेंडूवर गिब्सने पुन्हा लाँग ऑफला षटकार मारला. चौथ्या चेंडूवर डीप मि़डविकेटच्या वरुन, पाचव्या चेंडूवर वाईड लाँग ऑफला आणि सहाव्या चेंडूवर परत डीप मिडविकेटच्यावरुन षटकार मारला.

मात्र, एवढी चांगली खेळी करुनही गिब्जला शतकी खेळी उभारता आली नाही. तो ३१ व्या षटकातचं ४० चेंडूत ७१ धावा करुन परतला.

आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये युवराज, पोलार्डने मारले आहेत ६ चेंडूत ६ षटकात 

गिब्लनंतर २००७ सालीच टी२० विश्वचषकात युवराज सिंगने इंग्लंड विरुद्ध खेळताना स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर ६ चेंडूत ६ षटकार मारले होते. त्यावेळी तो सलग ६ षटकार मारणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसरा तर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पहिला क्रिकेटपटू ठरला होता.

त्याच्यानंतर ३ मार्च २०२१ला वेस्ट इंडिडचा किरॉन पोलार्डने श्रीलंका विरुद्ध झालेल्या टी२० सामन्यात ६ चेंडूत ६ षटकार मारले. त्याने अकिला धनंजयाच्या षटकात ६ चेंडूत ६ षटकार ठोकले.

महत्त्वाच्या बातम्या –

डिलिट करा ते! आयसीसीने शेअर केलेल्या ‘एमएस मलिंगा’ फोटोवर चाहते भडकले

व्हिडिओ : सचिनच्या १००व्या शतकाची नववी वर्षपूर्ती, सहकार्‍यांनी केले खास सेलिब्रेशन

केवळ बुमराहच नाही, तर ‘या’ ५ क्रिकेटपटूंनाही स्पोर्ट्स अँकर्सने प्रेमाच्या पिचवर केलंय ‘क्लिन बोल्ड’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---