---Advertisement---

सचिन-द्रविडने केलेले ‘महापराक्रम’; मात्र, संघावर ओढवलेली पराभवाची नामुष्की; वाचा ‘त्या’ विशेष सामन्याबाबत

sachin hundred
---Advertisement---

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. हे दोन्ही संघ लवकरच ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ कसून सराव करताना दिसून येत आहे. हा सामना सेंच्युरियनच्या मैदानावर पार पडणार आहे. या मैदानासोबत माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचे खास नाते आहे. याच मैदानावर सचिन तेंडुलकरने आपल्या कसोटी कारकीर्दीतील ५० वे शतक झळकावले होते.(on this day sachin tendulkar scored his 50th test century)

भारतीय संघ नोव्हेंबर २०१० मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होता. या दौऱ्यावर सेंच्युरियनच्या मैदानावर पार पडलेल्या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिका संघाकडून मोर्ने मॉर्कल आणि डेल स्टेन हे घातक गोलंदाजी करत होते. ज्यामुळे भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघा १३६ धावांवर संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाने ४ बाद ६२० धावांचा डोंगर उभारला होता. ज्यामध्ये ५ फलंदाजांनी ५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. तर एकट्या जॅक कॅलिसने दुहेरी शतक झळकावले होते.

सचिनचे ५० वे शतक तरी भारतीय संघ झाला होता पराभूत

भारतीय संघाने या सामन्यातील पहिल्या डावात निराशाजनक कामगिरी केली होती. ही कामगिरी विसरून त्यांनी दुसऱ्या डावात जोरदार पुनरागमन केले होते. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या दोघांनी अर्धशतक झळकावले होते. राहुल द्रविड ४३ धावा करत माघारी परतला होता. यासह राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये १२ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

त्यानंतर सचिन तेंडुलकर फलंदाजी करण्यासाठी आला होता. सचिन तेंडुलकरने जबाबदारी स्वीकारली आणि सामन्याच्या चौथ्या दिवशी (१९ डिसेंबर) ६ तास फलंदाजी केली. यादरम्यान त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ५० वे शतक झळकावले होते. तर एमएस धोनीने ९० धावांचे योगदान दिले होते. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाचा संपूर्ण डाव ४५९ धावांवर संपुष्टात आला होता. ज्यामुळे भारतीय संघाला एक डाव आणि २५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

आपल्या वडिलांना समर्पित केले होते शतक 

सचिन तेंडुलकरने हे शतक आपल्या वडिलांना समर्पित केले होते. कारण ५० वे शतक झळकावण्यापूर्वी त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांचा वाढदिवस होता. तसेच सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आपल्या कारकीर्दीत एकूण १०० शतक झळकावली आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

‘विश्वविक्रमवीर’ एजाज पटेलचे होतेय पुन्हा कौतुक; ‘हे’ आहे कारण

बीसीसीआय-विराट वाद रंगला असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा; दिले ‘हे’ कारण

भारतीय क्रिकेटचे भविष्य सांभाळणार लखनऊ-अहमदबादचे नेतृत्व? मिळालीये तब्बल ‘इतक्या’ कोटींची ऑफर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---