भारतीय क्रिकेटला खूप मोठा वारसा आहे. याच संघात अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले, ज्यांनी भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. याच दिग्गज खेळाडूंपैकी एक दिग्गज खेळाडू म्हणजे विनू मंकड होय. मंकड यांनी त्यांच्या कारकीर्दीत भारतीय संघाला अनेक मोठे विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. मंकड यांची मंगळवारी (१२ एप्रिल) जयंती साजरी केली जाते. त्यांचा जन्म १२ एप्रिल, १९१७ रोजी गुजरातच्या जामनगरमध्ये झाला होता.
विनू मंकड (Vinoo Mankad) यांनी भारतीय संघाला पहिला कसोटी सामना जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांनी वयाच्या २९व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले होते. त्यांना साल १९४६ मध्ये झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली होती. चार महिने चाललेल्या या दौऱ्यावर भारतीय संघाने एकूण २९ सामने खेळले होते. या सामन्यांमध्ये फिरकीचे जादूगार विनू मंकड यांनी १२९ गडी बाद केले होते. यासोबतच त्यांनी १००० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या, असा कारनामा करणारे ते एकमेव क्रिकेटपटू ठरले होते.
#OnThisDay in 1917, Vinoo Mankad was born. An India all-rounder, he reached the combo of 100 wickets/1000 runs in 23 Tests, a record until 1979 when it was broken by two Tests by Ian Botham. pic.twitter.com/VMTXyqt9gF
— ICC (@ICC) April 12, 2018
विनू मंकड यांची कारकीर्द
विनू मंकड यांनी भारतीय संघासाठी ४४ कसोटी सामने खेळले होते. यात त्यांनी ३१.४७ च्या सरासरीने २१०९ धावा केल्या होत्या. यासोबतच त्यांनी १६२ गडी देखील बाद केले होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत ५ शतक आणि ६ अर्धशतक झळकावले आहेत.
भारतीय संघाला पहिला कसोटी सामना जिंकवून देण्यात बजावली होती मोलाची भूमिका
विनू मंकड यांनी १९५२ मध्ये भारतीय संघाला पहिला वहिला कसोटी सामना जिंकवून देण्यात मोलाची भुमिका बजावली होती. त्यांनी या सामन्यात तब्बल १२ गडी बाद केले होते. त्याच इंग्लंड दौऱ्यावर त्यांनी सलामीला फलदांजी करताना लॉर्ड्सच्या मैदानावर ७२ आणि १८४ धावांची खेळी केली होती. यासोबतच त्यांनी ५ गडी देखील बाद केले होते. दुर्दैवाने हा सामना भारतीय संघाने गमावला होता. याच सामन्यात त्यांनी फलंदाजी करताना सलामी फलंदाजी केली आणि पहिले षटक देखील त्यांनीच टाकले होते.
इथून झाली माकडींगला सुरुवात
साल १९४७-४८ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर अमरनाथ यांनी म्हटले होते की, “जर विनू नसता तर ऑस्ट्रेलियाने १००० धावा केल्या असत्या.” या दौऱ्यावरील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाज ब्राऊनला धावचीत केले होते. हे फक्त धावचीत नव्हते केले, तर आगळ्या वेगळ्याप्रकारे धावचीत केले होते. जेव्हा मंकड गोलंदाजी करत होते, तेव्हा ब्राउन धाव घेण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला विनू यांनी त्याला चेतावणी दिली, तरी सुद्धा ते पुढे जात होता. त्यामुळे त्यांनी चेंडू न टाकता त्याला धावचीत केले होते. यामुळेच अशाप्रकारे धावचीत करण्याच्या प्रकाराला ‘माकडींग’ असे म्हटले जाऊ लागले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
व्याजासकट परतफेड! उमरानने १४०kph वेगाचा चेंडू मारला, चिडलेल्या हार्दिकनेही दिले भारी प्रत्युत्तर
अरेरे! हार्दिकने मोडला स्वत:चाच विक्रम, हैदराबादविरुद्ध ‘कासवा’सारखा खेळत नकोसा विक्रम नावावर
वॉट अ कॅच! खतरनाक शुभमनला आऊट करण्यासाठी त्रिपाठीचा हवेत सूर मारत एकहाती झेल- Video