स्पर्धा टी20 विश्वचषक 2022… मैदान जगातील दुसरे सर्वात मोठे मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड… मैदानावर उभे ठाकलेले क्रिकेटविश्वातील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान… सर्वात हाय वोल्टेज असलेल्या या सामन्यावर संपूर्ण जगाची नजर होती. आणि या सामन्यात उभा राहिला जगातील सर्वात मोठा फलंदाज विराट कोहली. अनेक विक्रम नावे असलेल्या विराटने या दिवशी सिद्ध केले ते आपण वर्तमान काळातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आहोत.
.@imVkohli, it was undoubtedly the best innings of your life. It was a treat to watch you play, the six off the back foot in the 19th over against Rauf over long on was spectacular! 😮
Keep it going. 👍 #INDvPAK #T20WorldCup pic.twitter.com/FakWPrStMg— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 23, 2022
तब्बल एक लाखांपेक्षा जास्त भारत आणि पाकिस्तानचे प्रेक्षक हजर असलेल्या या मैदानावर पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार बाबर गोल्डन डक तर मोहम्मद रिजवान फक्त चार धावा काढून माघारी परतला. इफ्तिखार 34 चेंडूत 51 आणि शान मसूद 42 चेंडूत नाबाद 52 यांनी काही शानदार फलंदाजी करून पाकिस्तानचा डाव पुन्हा जिवंत केला. शाहीन आफ्रिदीने महत्त्वपूर्ण 16 धावा करून पाकिस्तानला 159 पर्यंत पोहोचवले. भारतासाठी हार्दिक व अर्शदीप यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार रोहित, उपकर्णधार राहुल, नंबर वन टी20 फलंदाज सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल हे चौघे फक्त 31 धावांमध्ये माघारी परतले. सलग दुसऱ्या टी20 विश्वचषकात पाकिस्तान भारताला मात देणार अशी परिस्थिती निर्माण झालेली.
त्यानंतर सर्वांच्या नजरा वळल्या विराट आणि हार्दिक यांच्या भागीदारीकडे. कोणतीही जोखीम न पत्करता त्यांनी एकेक धाव जोडली. हळूहळू दोघांची भागीदारी शतकीय वाटचाल करत होती. शेवटच्या दोन षटकांत 31 धावांची गरज होती. रौफ टाकत असलेल्या 19 व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर कोहलीने दोन उत्तुंग षटकार ठोकून शेवटच्या सहा चेंडूत १६ धावांचे समीकरण बनवले. पाचव्या चेंडूवर पुढच्या दिशेने मारलेल्या षटकार बॅकफूट पंचचा षटकार हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फटक्यांपैकी एक मानला जातो.
शेवटच्या षटकातही मोठे नाटक घडले. हार्दिक पहिल्या चेंडूवर बाद झाला. दुसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिकने एक धाव काढली. नवाझने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूवर विराटने दोन धावा काढल्या. पुढच्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला मात्र तो चेंडू नो-बॉल देण्यात आला. त्यानंतर नवाजने वाईड चेंडू टाकला. फ्री हिटच्या चेंडूवर विराट आणि कार्तिकने चपळाई दाखवत थेट तीन धावा पळून काढल्या. पाचव्या चेंडूवर कार्तिक यष्टिचित झाला आणि सामन्याला निर्णायक वळण आले. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची आवश्यकता असताना सर्वांची नजर रविचंद्रन अश्विनवर होती. मात्र डोक्यावर बर्फ ठेवल्याप्रमाणे अश्विन त्या चेंडूवर अक्षरशः बाजूला झाला आणि चेंडू वाईड झाला. शेवटच्या चेंडूवर त्याने शांतचित्ताने एक धाव काढून भारताला एक अविस्मरणीय विजय मिळवून दिला.
या 53 चेंडूतील 82 धावांसह विराट याने दाखवून दिले की सध्याच्या घडीला आपल्या इतका मोठा खेळाडू जगात कोणीही नाही. संपूर्ण विश्वचषक गाजवत त्याने सर्वाधिक धावा केल्या. मात्र, त्याने हारिस रौफला मारलेला षटकार आणि त्यावर हर्षा भोगले यांनी म्हटलेले, “कोहली गोज डाऊन द ग्राऊंड… कोहली गोज आऊट ऑफ द ग्राऊंड…”हे शब्द कायमचे अजरामर झाले.
(One Year Anniversary Of Virat Kohli 82 Against Pakistan In T20 World Cup 2022)
महत्वाच्या बातम्या –
आयसीसी स्पर्धेत ‘ही’ उंची गाठणं येड्या गबाळ्यांच काम नाही, सचिन-गेलला न जमलेली कामगिरी विराटने केली
अफगाणिस्तान पाकिस्तानलाही धक्का देण्याच्या तयारीत! चेपॉकवर रंगणार फिरकीचे युद्ध