फिफाने 2018च्या सर्वोत्कृष्ठ पुरूष खेळाडू पुरस्काराची नामांकनाची यादी कालच(24जुलै) जाहिर केली आहे.
यामध्ये क्रिस्तियानो रोनाल्डो, लियोनल मेस्सी, कायलिन एमबाप्पे, हॅरी केन, लुका मॉड्रिच, मोहम्मद सलाह, राफेल वॅराने, एडन हझार्ड, एंटोनी ग्रिझमन, केविन डी ब्रुने या फुटबॉलपटूंचा समावेश आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे यात राफेल वॅराने हा फक्त एकच डिफेंडर असून बाकीचे मिडफिल्डर आणि अटॅकर्स आहेत.
OFFICIAL | The nominees for #TheBest FIFA Men’s Player 2018:
Cristiano Ronaldo
Kevin De Bruyne
Antoine Griezmann
Eden Hazard
Harry Kane
Kylian Mbappe
Lionel Messi
Luka Modric
Mohamed Salah
Raphael VaraneFor the period 3 July 2017-15 July 2018 pic.twitter.com/bqt8tDWY8d
— FIFA (@FIFAcom) July 24, 2018
वॅराने याने मे महिन्यातच रियल माद्रिद कडून खेळताना चॅम्पियन्स लीग आणि जुलैमध्ये फ्रान्सकडून खेळताना फिफा विश्वचषक जिंकला आहे. एकाच वर्षात अशा दोन मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा तो जगातील नववा फुटबॉलपटू आहे.
LaLiga Santander 🏆🏆
Champions League 🏆🏆🏆🏆
Mundial 🏆
Mundial de Clubes 🏆🏆🏆
Supercopa de Europa 🏆🏆🏆
Copa del Rey 🏆
Supercopa de España 🏆🏆🇫🇷 Don Rafael Varane 🇫🇷
🔝 ¡¡16 títulos!! 🔝
Y solo tiene 25 años. 😱 pic.twitter.com/gFBccrUfQ7
— LALIGA (@LaLiga) July 17, 2018
वॅराने बरोबरच या फिफाच्या पुरस्कारासाठी त्याचे क्लबसहकारी मॉड्रिच आणि माजी क्लबसहकारी रोनाल्डो तसेच आणखी सात फुटबॉलपटू शर्यतीत आहे.
विजेत्यांची नावे लंडन येथे 24 सप्टेंबरला घोषित केली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–रोनाल्डोचा फिटनेस वीस वर्षाच्या तरूण फुटबॉलपटूसारखा
–इंडोनेशियन फुटबॉल चाहत्यांनी केली एशियन गेम्सच्या स्टेडियमची तोडफोड