भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर- 4 फेरीतील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाविरुद्ध खेळताना खास कारनामा केला आहे. असा कारनामा करण्याची त्याची तिसरीच वेळ होती. विशेष म्हणजे, मागील वेळी पाकिस्तानविरुद्ध खेळताना रोहितला खास प्रदर्शन करता आले नव्हते. मात्र, यावेळी त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चला तर, त्याच्या कारनाम्याविषयी जाणून घेऊयात…
रोहितचा विक्रम
भारत विरुद्ध पाकिस्तान संघात कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावत फलंदाजीला उतरला. यावेळी भारताकडून डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी केली. पाकिस्तानकडून पहिले षटक शाहीन आफ्रिदी याने टाकली. यावेळी आफ्रिदीने पहिले पाचही चेंडू स्ट्राईकवर असलेल्या रोहितला निर्धाव टाकले. मात्र, अखेरच्या चेंडूवर रोहितने खणखणीत षटकार मारला. रोहितने हा षटकार मारल्यामुळे त्याच्या नावावर खास पराक्रम नोंदवला गेला.
https://twitter.com/SeerviBharath/status/1700806775958860055
वनडे क्रिकेटच्या डावातील पहिल्याच षटकात षटकार मारण्याची रोहित शर्मा याची ही तिसरीच वेळ होती. यापूर्वी रोहित शर्माने सर्वप्रथम 2018मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथे खेळताना मॉर्ने मॉर्केल याने टाकलेल्या पहिल्या षटकात षटकार खेचला होता. तसेच, 2019च्या विश्वचषकात बर्मिंगहम येथे बांगलादेशविरुद्ध खेळताना मश्रफे मोर्तझा याच्या पहिल्या षटकात षटकार मारला होता.
वनडे क्रिकेटच्या डावातील पहिल्याच षटकात रोहित शर्माचे षटकार
विरुद्ध- दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, 2018 (मॉर्ने मॉर्केल)
विरुद्ध- बांगलादेश, बर्मिंगहम, 2019 (मश्रफे मोर्तझा)
विरुद्ध- पाकिस्तान, सेंच्युरियन, 2023 (शाहीन आफ्रिदी)
रोहितची आशिया चषकातील कामगिरी
रोहित शर्मा हा पाकिस्तानविरुद्ध स्पर्धेतील आपला तिसरा सामना खेळत आहे. यापूर्वी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध रोहितला खास प्रदर्शन करता आले नव्हते. त्याला 22 चेंडूत 11 धावाच करता आल्या होत्या. त्याला शाहीन आफ्रिदी याने त्रिफळाचीत बाद केले होते. त्यानंतर रोहितने दुसऱ्या सामन्यात नेपाळविरुद्ध बॅटमधून धावांचा पाऊस पाडला होता. रोहितने 59 चेंडूत 74 धावा कुटल्या होत्या. यामध्ये 5 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. आता पाकिस्तानविरुद्धच्या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात रोहित कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Only the 3rd time Rohit Sharma has hit a SIX in the first over of the innings in ODI know here details)
हेही वाचाच-
श्रेयस पुन्हा दुखापतग्रस्त! पाठीच्या दुखण्याने खाल्ली उचल, वर्ल्डकपआधी वाढली चिंता
भविष्यवाणीचे सत्र थांबेना! आता स्टीव्ह स्मिथ म्हणाला, ‘या’ 2 संघात होईल World Cup 2023ची Final