भारताचा कर्णधार विराट कोहली आणि भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांची क्रिकेट क्षेत्रात आपापली एक वेगळीच ओळख आहे. विराटला जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये गणले जाते. त्याने क्रिकेटच्या सर्व स्वरूपात दमदार खेळी केली आहे. जगभरातील क्रिकेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, विराट हा आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ठ क्रिकेटपटू आहे.
तर, लक्ष्मणने (VVS Laxman) त्याच्या कौशल्याने भारतीय क्रिकेटमध्ये आपले एक विशिष्ट स्थान बनवले आहे.
जरी हे दोन्ही क्रिकेटपटू आपापल्या वेळेला उत्कृष्ट होते आणि त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले असतील तरीही या दोन्ही क्रिकेटपटूंनी एक अनोखा आणि नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. क्रिकेटमध्ये खेळाडूचा पाय किंवा बॅट यष्टीला लागून बाद होणे ही लाजिरवाणी गोष्ट समजली जाते आणि त्यातही जर खेळाडू शतक ठोकल्यानंतर अशाप्रकारे बाद झाला, तर खूपच वाईट समजले जाते.
वाईट गोष्ट ही आहे की, विराट आणि लक्ष्मण हे दोन्ही क्रिकेटपटू आपले शतक पूर्ण करून, त्यांचा पाय किंवा बॅट यष्टीला लागल्याने बाद झाले आहेत.
भारतीय वनडे क्रिकेटच्या इतिहासात विराट (Virat Kohli) हा एकमेव असा क्रिकेटपटू आहे, ज्याने शतकी खेळी केली आणि त्यानंतर तो त्याचा पाय किंवा बॅट यष्टीला लागल्याने बाद झाला आहे. झाले असे की, १६ सप्टेंबर २०११मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना विराटने वनडे सामन्यात शतकी खेळी केली होती.
यावेळी ९३ चेंडूत १ षटकार आणि ९ चौकार मारत त्याने १०७ धावा केल्या होत्या. मात्र, पुढे तो इंग्लंडचा फिरकीपटू ग्रॅमी स्वानच्या (Greame Swan) चेंडूवर त्याचा पाय किंवा बॅट यष्टीला लागून बाद झाला होता.
तर, लक्ष्मण हा भारतीय कसोटी इतिहासातील एकमेव असा क्रिकेटपटू आहे, ज्याने कसोटीत शतकी खेळी केली आणि त्यानंतर तो त्याचा पाय किंवा बॅट यष्टीला लागल्याने बाद झाला. ही घटना २००२मध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यावर घडली होती.
यावेळी कसोटी सामन्यातील पहिल्या डावात २४४ चेंडूत लक्ष्मणने १३० धावा केल्या होत्या आणि नंतर तो वेस्ट इंडिजचा मर्व्हिन डिलनच्या (Mervyn Dillon) चेंडूवर त्याचा पाय किंवा बॅट यष्टीला लागल्याने बाद झाला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएलमध्ये करोडोंची कमाई करुन मालामाल झालेले ५ अष्टपैलू
-आयुष्यात पहिल्यांदाच घेतलेली काॅफी पंड्याला पडली भलतीच महागात
-जर आयपीएल झाली नाही तर १० कोटींवर पाणी सोडावे लागणारे ५ खेळाडू