क्रिकेटप्रेमींच्या ४ जून, १९९३ ही तारीख चिरस्मरणात राहणारी आहे. कारण याच दिवशी क्रिकेटच्या मैदानावर एक चमत्कार घडला होता. जो की यापूर्वी कधीच घडला नव्हता. पुढेही असा चमत्कार घडणे जणू अशक्यप्रायच. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने एक चेंडू फेकला होता. हा चेंडू ‘बॉल ऑप्स द सेंच्युरी’ ठरला. शेन वॉर्नने टाकलेला चेंडू चांगला हातभर काटकोनात वळत इंग्लंडचा दिग्गज फलंदाज माईक गॅटिंग यांच्या दांडी गुल केल्या.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ऍशेज मालिकेला मँचेस्टर कसोटीपासून सुरुवात झाली होती. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने सर्वबाद २८९ धावा केल्या होत्या. इंग्लंडनेही प्रत्युत्तरात दमदार सुरुवात केली होती. त्यांचा १ बाद ७१ अशी धावसंख्या होती. त्यानंतर माईक गॅटिंग मैदानावर येत चौकार ठोकून आपले खाते उघडले होते. ऍलन बॉर्डर यांनी गॅटिंग आणि ग्रॅहम गुच यांना बाद करण्यासाठी चेंडू शेन वॉर्नकडे सोपवला आणि त्याच्या पहिल्याच चेंडूने जणू इतिहास घडवला होता.
We're never getting over this, Warney 🤩pic.twitter.com/JXEAU9KGhR
— ICC (@ICC) June 4, 2020
शेन वॉर्नने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ करत पहिल्याच चेंडूवर दांड्या गुल केल्या. त्याने टाकलेला चेंडू इतका अप्रतिम होता की क्रिकेट समीक्षकांकडे त्या चेंडूचे वर्णन करण्यासाठी शब्दही फिके पडतात. शेन वॉर्नने गॅटिंगल यांना लेग स्टम्पवर चेंडू टाकला. मात्र त्यांनी डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या बाजूने अलगदपणे वळण घेत ऑफ स्टम्पवर जाऊन धडकला. खुद्द फलंदाजालाही चेंडू स्टम्पवर कधी जाऊन धडकला हेदेखील समजले नाही. ते ही हा चेंडू पाहून आश्चर्यचकित झाले होते.
‘बॉल ऑफ द सेन्चुरी’नंतर शेन वॉर्न रातोरात स्टार झाला होता. पुढे त्याने एका मुलाखतीत सांगितले की, “असा चेंडू टाकेन असं कधी मला वाटले नव्हते. मी फक्त लेगब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू ९० डिग्रीमध्ये फिरला जो एक चमत्कारच होता. ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ क्षण माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम क्षण असल्याचेही त्याने नमूद केले.
या कसोटीपूर्वी शेन वॉर्नने केवळ अकरा कसोटी सामने खेळले होते. यापूर्वी त्याने सहा महिन्यांपूर्वी बॉक्सिंग डे कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना बावन धावांत सात सात गडी बाद केले होते. त्याच्या दमदार कामगिरीमुळे त्याला ऍशेस मालिकेत संधी मिळाली आणि त्याने चमत्कार घडवला, तेव्हा त्याचे वय केवळ २३ वर्ष होते.
कसोटी क्रिकेटमध्ये शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना ७०८ बळी घेतले होते. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसरा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चाहत्यांचा लाडका शेन..! जेव्हा भारतीय चाहत्यासाठी शेन वॉर्न थेट गर्दीत घुसला होता, पाहा तो व्हिडिओ
‘या’ भारतीयाच्या विकेटने २९ वर्षांपूर्वी झाली होती शेन वॉर्न पर्वाची सुरुवात…