---Advertisement---

आठवणीतील सामना: भारतीय संघ १९ वर्षांपूर्वी क्रिकेटमधील सर्वात मोठा सामना झाला होता पराभूत

---Advertisement---

आत्तापर्यंत भारताने क्रिकेटमध्ये जसे अनेक मोठे विजय मिळवले आहेत. तसेच अनेकदा मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला पराभवाचाही सामना करावा लागला आहे. असाच सर्व भारतीयांसाठी एक कटू आठवण ठरणारा एक पराभव म्हणजे 2003 विश्वचषचषकाच्या अंतिम सामन्यातील.

दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया येथे आयोजित करण्यात आलेल्या या विश्वचषकात भारतीय संघाने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली शानदार कामगिरी करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. पण त्यावेळी भारतीय संघाचा अंतिम सामना त्यावेळीच्या रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बलाढ्य ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार होता.

या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ऑस्ट्रेलियाकडून सुरुवातीला ऍडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन यांनी सलामीलाच 105 धावांची भागीदारी करत दमदार सुरुवात केली. हे दोघे बाद झाल्यानंतर कर्णधार रिकी पाँटिंग आणि डॅमियन मार्टिनने फलंदाजीची जबाबदारी हाती घेत 234 धावांची नाबाद भागीदारी रचली.

पाँटिंगने 121 चेंडूत नाबाद 140 धावांची खेळी केली. तर मार्टिनने नाबाद 88 धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 359 धावांचा डोंगर उभा केला आणि भारताला 360 धावांचे आव्हान विजयासाठी दिले.

या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानंतर भारताने दुसरी विकेट गांगुलीच्या रुपात 10 व्या षटकात गमावली. एक बाजू विरेंद्र सेहवागने सांभाळली होती. मात्र तोही 82 धावांवर असताना धावबाद झाला.

यानंतर भारताचे अन्य फलंदाज नियमित अंतराने बाद झाले. अखेर भारताचा डाव 234 धावांवर संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना 125 धावांनी जिंकत तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. मात्र भारताने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न तुटले.

महत्त्वाच्या बातम्या – 

प्रतिभा असूनही भारतीय संघासाठी दुसरी संधी न मिळालेला कमनशिबी शिलेदार ‘अतुल वासन’

चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा धोनी ‘या’ विक्रमात सर्वात टॉपला; दिनेश कार्तिक फक्त ३ पावलं दूर

ना विराट, ना धोनी आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा, ‘मिस्टर आयपीएल’ने सांगितली नावे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---