भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) ऍडलेड येथे इंग्लंडचा सामना केला. टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भिडण्यासाठी भारतीय संघाचे खेळाडू जीवाचे रान करताना दिसले. मात्र, या सामन्यात संघाचा सलामी फलंदाज केएल राहुल सपशेल फ्लॉप ठरला. या सामन्यात त्याला दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. यामुळे त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली.
या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाकडून सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी डावाची सुरुवात केली. या महत्त्वाच्या सामन्यात राहुलकडून चाहत्यांना तसेच भारतीय संघाला खूप अपेक्षा होत्या. मात्र, तो या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला. राहुल या सामन्यात 5 चेंडूत 5 धावा करत तंबूत परतला.
यामुळे त्याच्या नावावर टी20 विश्वचषकात अव्वल 8 क्रमांकाच्या संघांविरुद्ध सर्वात खराब कामगिरी करण्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. राहुलने टी20 विश्वचषकात दुबई येथे पाकिस्तानविरुद्ध खेळताना 8 चेंडूत 3 धावा केल्या होत्या. त्यानंतर याच ठिकाणी त्याने न्यूझीलंडविरुद्ध 16 चेंडूत 18 धावांची खेळी साकारली होती. ही त्याची या यादीतील सर्वोत्तम धावसंख्या म्हणता येईल. पुढे त्याने टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात मेलबर्न येथे पाकिस्तानविरुद्द 8 चेंडू खेळताना 4 धावा केल्या होत्या. पर्थ येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याला 14 चेंडूत 9 धावाच करता आल्या होत्या. त्यानंतर उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध तो फक्त 5 धावाच करू शकला. (Skipper KL Rahul in T20 World Cups vs top eight ranked teams)
अव्वल 8 क्रमांकाच्या संघाविरुद्ध केएल राहुलची टी20 विश्वचषकातील कामगिरी
3 (8 चेंडूत), विरुद्ध- पाकिस्तान, दुबई
18 (16 चेंडूत), विरुद्ध- न्यूझीलंड, दुबई
4 (8 चेंडूत), विरुद्ध- पाकिस्तान, मेलबर्न
9 (14 चेंडूत), विरुद्ध- दक्षिण आफ्रिका, पर्थ
5 (5 चेंडूत), विरुद्ध- इंग्लंड, ऍडलेड*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाणेफेक इंग्लंडच्या नावे! उपांत्य सामन्यात टीम इंडिया करणार पहिली फलंदाजी; ‘असा’ आहे संघ
BREAKING! इंग्लंडला मोठा धक्का, ‘हा’ प्रमुख गोलंदाज भारताविरुद्धच्या सामन्याला मुकणार