fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भर लाॅकडाऊनमध्ये विशेष विमानाने न्यूझीलंडची टीम ऑस्ट्रेलियामध्ये, आता खेळणार…

Others New Zealand Warriors have Touched down in Australia

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसच्या भयानक प्रादुर्भावामुळे क्रीडा स्पर्धांवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आलेल्या आहेत. सध्या या स्पर्धा केव्हा सुरु होतील याची कोणालाही कुठलीही कल्पना नाही.

त्यामुळे खेळाडूंसमाेरदेखील घरात बसण्याखेरीज इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही. परंतु असे असले तरी विशेष म्हणजे न्यूझीलंडचा एक संघ मात्र ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचला आहे.

न्यूझीलंड वॉरिअर्सचा संघ ‘राष्ट्रीय रग्बी लीगमध्ये’ (National Rugby League) खेळण्यासाठी रविवारी (३मे) ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचला आहे. त्यामुळे कोविड-१९च्या परिस्थितीत जगभरात लागलेल्या लॉकडाऊनमध्ये खेळांचे आयोजन पुन्हा सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय रग्बी लीगने न्यूझीलंड संघाचे ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेश मिळविण्याबाबत मंजुरी मिळविली होती. संघाच्या आगमनामुळे चाहत्यांमध्येही एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह पहायला मिळत आहे.

न्यूझीलंड वॉरिअर्सचा (New Zealand Warriors) संघ एका खास विमानाने सकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी टॅमवर्थमध्ये उतरला होता. हे ठिकाण सिडनी शहराच्या जवळच आहे. न्यूझीलंड वॉरिअर्सला या ठिकाणी १४ दिवस स्वतंत्रपणे रहावे लागणार आहे.

ही स्पर्धा २८ मेपासून सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावर बंदी आहे. परंतु ऑस्ट्रेलिया सरकारने शनिवारी (२मे) ३६ खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना परवानगी दिली.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणे कमी झाली आहेत. त्यामुळे हा निर्णय घेेण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

You might also like