इंग्लंडमधील व्यावसायिक क्रिकेट लीग असलेल्या द हंड्रेड लीगचे अंतिम सामने रविवारी (27 ऑगस्ट) खेळले गेले. पुरुषांच्या अंतिम सामन्यात ओव्हल इन्विन्सिबल्स आणि मँचेस्टर ओरिजनल्स हे संघ आमने-सामने आले होते. खराब सुरुवातीनंतरही ओव्हल संघाने मोठी धावसंख्या उभारत मँचेस्टर संघाला 14 धावांनी पराभूत केले. संघाचे हे पहिलेच विजेतेपद आहे.
लॉर्ड्स येथे झालेल्या या अंतिम सामन्यात मँचेस्टर संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय रिचर्ड ग्लेसन व इतर गोलंदाजांनी योग्य ठरवला. 36 चेंडूंवर केवळ 34 धावा देताना ओव्हल संघाचे पाच फलंदाज बाद करण्यात गोलंदाजांना यश आले होते. मात्र, त्यानंतर अष्टपैलू जिमी निशाम व टॉम करन यांनी मँचेस्टर संघाला सळो की पळो करून सोडले. करन याने 34 चेंडूंवर 67 तर निशामने 33 चेंडूंवर 57 धावांची खेळी करत आपल्या संघाला 161 पर्यंत पोहोचवले.
या धावांचा पाठलाग करताना मँचेस्टर संघाला सुरुवात संथ मिळाली. जोस बटलर व फिल सॉल्ट हे मनसोक्त फटकेबाजी करू शकले नाहीत. 42 चेंडूंवर 51 धावा झालेल्या असताना त्यांनी आपले चार फलंदाज गमावले होते. त्यानंतर मॅक्स होडेन व जेमी ओव्हरटन यांनी विजयासाठी थोडेफार प्रयत्न केले मात्र हे प्रयत्न तोकडे पडले. ओव्हल संघाच्या सर्वच गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करताना संघाला विजय मिळवून दिला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या टॉम करन याला सामनावीर तर संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केलेल्या मँचेस्टरच्या जेमी ओव्हरटन याला स्पर्धेचा मानकरी निवडले गेले.
याआधी झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात सदर्न ब्रेव्हज संघाने नॉदर्न सुपरचार्जर्सला 35 धावांनी नमवत विजेतेपद पटकावले. हा सामना सदर्न ब्रेव्हजची कर्णधार ऍना श्रबशोल हिच्या क्रिकेट कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला.
(Oval Invincibles Win The Hundred Mens 2023 Beat Manchester Originals In Final)
महत्वाच्या बातम्या –
‘तो माझ्या नेतृत्वातही खेळला आहे…’, माजी सलामीवीराने वनडेत सूर्यकुमारसाठी सुचवली खास बॅटिंग पोझिशन
BREAKING: स्मृतीची सदर्न ब्रेव्हज बनली ‘द हंड्रेड’ची चॅम्पियन, सुपरचार्जर्सच्या पदरी निराशा