लखनऊ सुपर जायंट्स संघाने थेट पहिल्याच आयपीएल हंगामात दिमाखात प्लेऑफ फेरी गाठली. बुधवारी (दि. १८ मे) आयपीएल २०२२मधील ६६व्या सामन्यात त्यांनी कोलकाता नाईट रायडर्स संघाला २ धावांनी पराभूत करत ही कामगिरी केली. विशेष म्हणजे, पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनऊकडून सलामीवीरांना आपली विकेट न गमावता धावांचा पाऊस पाडला. यातील एका सलामीवीराने सर्वांचे लक्ष वेधले. तसेच, विक्रमही आपल्या नावावर केले. तो फलंदाज इतर कुणी नसून क्विंटन डी कॉक आहे.
लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने घेतलेला निर्णय लखनऊच्या खेळाडूंनी योग्य असल्याचे सिद्ध केले. सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) याने यावेळी आयपीएल इतिहासातील तिसरी सर्वोच्च खेळी केली. त्याने या सामन्यात डावाची सुरुवात करताना अवघ्या ७० चेंडूत २००च्या स्ट्राईक रेटने १४० धावा चोपल्या. या धावा करताना त्याने १० चौकार आणि तब्बल १० षटकारांची बरसात केली.
डी कॉकच्या या अविश्वसनीय खेळीमुळे त्याने मोठा विक्रम करत खास यादीत स्थानही मिळवले. या १० षटकारांसह त्याने आयपीएलमधील १०० षटकारांचा आकडाही पूर्ण केला. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या यादीत सामील झाला.
डीकॉकने आयपीएलमध्ये एकूण १०५ षटकार मारले आहेत. यासह तो १२व्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिले स्थान ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेल याच्या नावावर आहे. त्याने आयपीएलमध्ये ३५७ षटकार खेचले आहेत. दुसऱ्या स्थानी एबी डिविलियर्स आहे. त्याने २५१ षटकार मारले आहेत. त्यानंतर कायरन पोलार्डने २२३, डेविड वॉर्नरने २१६, शेन वॉटसनने १९०, आंद्रे रसेलने १७५, ब्रेंडन मॅक्युलमने १३०, जोस बटलरने १२७, ग्लेन मॅक्सवेलने १२२, ड्वेन स्मिथने ११७, फाफ डू प्लेसिसने १०९ आणि डेविड मिलरने १०४ षटकार खेचले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे परदेशी खेळाडू
३५७ षटकार- ख्रिस गेल
२५१ षटकार- एबी डिविलियर्स
२२३ षटकार- कायरन पोलार्ड
२१६ षटकार- डेविड वॉर्नर
१९० षटकार- शेन वॉटसन
१७५ षटकार- आंद्रे रसेल
१३० षटकार- ब्रेंडन मॅक्युलम
१२७ षटकार- जोस बटलर
१२२ षटकार- ग्लेन मॅक्सवेल
११७ षटकार- ड्वेन स्मिथ
१०९ षटकार- फाफ डू प्लेसिस
१०५ षटकार- क्विंटन डी कॉक*
१०४ षटकार- डेविड मिलर
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफलातून! शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात लखनऊचा २ धावांनी विजय, प्लेऑफसाठी मिळवली पात्रता
अजून कोणाकडून नव्हे तर ‘अंपायर’कडून उमरान मलिक शिकलाय ‘पंच सेलिब्रेशन’ची स्टाईल
गेल, मॅक्यूलम सारखंच क्विंटन डिकाॅक हे नाव पण आदरानेच घ्या, कारण भावाने रेकॉर्डच तसा केलाय!