भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी फळीतील महत्त्वाचा खेळाडू असणाऱ्या जसप्रीत बुमराह याच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. बुमराह दीर्घ काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. तो मागील काही दिवसांपूर्वी पाठीच्या शस्त्रक्रियेसाठी ख्राईस्टचर्च येथे गेला होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्याची सर्जरी यशस्वीरीत्या पार पडली असून तो सध्या ठीक आहे. मात्र, या सर्जरीनंतर जसप्रीत बुमराह सहा महिने क्रिकेटपासून दूर असणार आहे. याचा अर्थ असा की, तो आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.
माध्यमांतील वृत्तांनुसार, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याची तब्येत आता ठीक आहे. मात्र, रुग्णालयाकडून त्याच्याविषयी कोणतेही अधिकृत भाष्य करण्याविषयी नकार देण्यात आला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “याबाबत भाष्य करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आहे आणि तेच बोलतील.”
जसप्रीत बुमराह गंभीर दुखापतीमुळे अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. मागील वर्षी आशिया चषकासोबतच तो टी20 विश्वचषकातून बाहेर पडला होता. तसेच, यावर्षीच्या सुरुवातीपासूनच दुखापतीमुळे त्याला भारतीय संघात जागाही मिळाली नाहीये.
विश्वचषक लक्षात ठेवून केली बुमराहची सर्जरी- रिपोर्ट्स
भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा वनडे विश्वचषक लक्षात घेऊन जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याचे फिट होणे खूपच गरजेचे होते. त्यामुळे बीसीसीआय वैद्यकीय पथकाला लवकरात लवकर बुमराहची सर्जरी करायची होती, जेणेकरून तो विश्वचषकापूर्वी मैदानावर पुनरागमन करू शकेल.
यापूर्वी भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सबा करीम यांनी बुमराहला एक महत्त्वाचा सल्ला दिला होता. त्यांनी बुमराहला त्याच्या गोलंदाजी ऍक्शनमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी म्हटले होते की, “जर बुमराहला त्याची कारकीर्द लांब न्यायची असेल, तर त्याला त्याच्या गोलंदाजी ऍक्शनमध्ये बदल करावाच लागेल. तेव्हाच तो दुखापतीपासून वाचू शकतो.” तसेच, त्यांनी बुमराहला कोणत्या तरी एकाच क्रिकेट प्रकारात खेळण्याचाही सल्ला दिला होता.
कधी खेळलेला शेवटचा सामना
जसप्रीत बुमराह याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर 2022मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20च्या रूपात खेळला होता. तो सामना भारतीय संघाने 6 विकेट्सने जिंकला होता. विशेष म्हणजे, बुमराहने 4 षटके गोलंदाजी करताना सर्वाधिक 50 धावा खर्च केल्या होत्या. मात्र, त्याला एकही विकेट घेण्यात यश आले नव्हते. (pacer jasprit bumrah undergoes surgery will need six months to recover)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्या दिग्गजांसोबत खेळला, डिविलियर्सने त्यांनाच केले दुर्लक्षित; म्हणाला, ‘हाच’ टी20चा महान खेळाडू
जबरदस्त डाईव्ह मारत राधाने एका हातात पकडला अविश्वसनीय कॅच, पाहून दीप्तीलाही बसला शॉक, Video Viral