भारतीय संघ 3 सामन्यांची वनडे मालिका जिंकण्याच्या इराद्याने तिसऱ्या टी20 सामन्यात उतरणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघ या मालिकेत उभय संघ 1-1 अशा बरोबरीवर आहेत. तिसऱ्या सामन्याला बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) सायंकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच पाहुण्या संघातील वेगवान गोलंदाजाने भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याचे कौतुक करत त्याच्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) याने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला जबरदस्त नेतृत्वकर्ता म्हटले आहे. तसेच, त्याने पंड्याच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभवही शेअर केला आहे. फर्ग्युसन याने पंड्याच्या नेतृत्वाविषयी बोलताना म्हटले की, “हार्दिक पंड्याला मी पहिल्या दिवसापासूनच खूप मानतो. मी त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स संघाकडून खेळलो आहे. तो एक जबरदस्त नेतृत्वकर्ता आहे. केन विलियम्सनही असाच कर्णधार आहे. संघात प्रत्येकासाठी त्याच्याकडे वेळ आहे.”
‘हार्दिक पंड्या शानदार कर्णधार’
पुढे बोलताना फर्ग्युसन म्हणाला की, “हार्दिक पंड्या याने भारतीय संघासाठी खूप चांगले नेतृत्व केले आहे. जर तुम्ही त्याचे हावभाव पाहिले, तर तो खूपच शानदार राहतो. तो एक शानदार कर्णधार आहे. मला त्याच्या नेतृत्वात खेळून खूप मजा आली.”
फर्ग्युसनविषयी बोलायचं झालं, तर तो सध्या न्यूझीलंड संघासोबत भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील अखेरचा टी20 सामना बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे पार पडणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ ही मालिका आपल्या नावावर करेल. हा दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ सामना आहे. मागील सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने मालिकेत बरोबरी केली होती. मात्र, तोदेखील एक कठीण विजय होता. यावेळी चांगल्या रणनीतीसोबत मैदानावर उतरणाऱ्या संघाला विजय मिळण्याची शक्यता जास्त असेल.
न्यूझीलंड संघातही अनेक दिग्गज खेळाडू उपस्थित नाहीयेत. तरीही त्यांनी भारतीय संघाला कडवी झुंज दिली आहे. त्यांनी पहिला टी20 सामना सहजरीत्या जिंकला होता. तसेच, दुसऱ्या सामन्यात कमी धावा करूनही त्यांनी भारतीय संघाला शेवटच्या षटकापर्यंत विजयापासून दूर ठेवले होते. आता तिसऱ्या टी20त कोण बाजी मारते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (pacer lockie ferguson hails skipper hardik pandyas leadership skills)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतासाठी उफाळून आलं पाकिस्तानी क्रिकेटपटूचे प्रेम; म्हणाला, ‘जेव्हाही भारतात खेळतो, तेव्हा…’
आयसीसी टी20 रँकिंगमध्ये सूर्याच बादशाह! नावावर केला आतापर्यंत कुठल्याही भारतीयाला न जमलेला रेकॉर्ड