भारतीय संघाने शनिवारी (दि. 21 जानेवारी) रायपूर येथे खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्याचा हिरो भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी राहिला. शमीने यादरम्यान सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्यासाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. सामन्यानंतर त्याने जसप्रीत बुमराह याच्याविषयी मोठे भाष्य केले.
मोहम्मद शमी याचे बुमराहविषयी भाष्य
जसप्रीत बुमराह (Japrit Bumrah) भारतीय संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज आहे. तो दीर्घ काळापासून संघाबाहेर आहे. बुमराह पुनरागमन करणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. त्याचा नुकताच एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात तो सराव करताना दिसत आहे. अशातच बुमराहच्या पुनरागमनाविषयी संघसहकारी मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला विचारणा केली असता, त्याने मोठे भाष्य केले. शमीने बुमराहची प्रशंसा केली, परंतु असेही म्हटले की, क्रिकेट कुणाच्याही नसण्याने थांबत नाही.
‘हा खेळ कुणासाठीच थांबत नाही’
माध्यमांशी बोलताना मोहम्मद शमी याने म्हटले की, “जसप्रीत बुमराह मोठा खेळाडू आहे, परंतु जर कोणत्याही कारणामुळे एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला, तरीही खेळ कुणासाठीही थांबत नाही. चांगल्या खेळाडूची नेहमीच कमतरता भासते. बुमराहची कमी संघाला नक्कीच भासली आहे. तो चांगला गोलंदाज आहे. आम्ही फक्त हीच प्रार्थना करतो की, तो लवकर संघात परत येईल, ज्यामुळे संघाला आणखी मजबूती मिळेल. तो लवकरच त्याच्या फिटनेसवर काम करेल, ज्यामुळे संघात त्याचे पुनरागमन होईल.”
शमीची सामन्यातील कामगिरी
मोहम्मद शमी याच्या सामन्यातील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 6 षटके गोलंदाजी केली. यादरम्यान शमीने फक्त 18 धावा खर्च केल्या. विशेष म्हणजे, यावेळी त्याने इतर भारतीय गोलंदाजांच्या तुलनेत सर्वाधिक विकेट्स आपल्या नावावर केल्या. यादरम्यान त्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या. (pacer mohammad shami gave big update on jasprit bumrah fitness and return in ind vs aus test series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुजाराला ‘हा’ गोलंदाज वाटतो सर्वोत्तम! आजवर अनेकदा ठरलाय त्याचाच शिकार
अवघ्या दोनच दिवसात ‘रॉकस्टार’ जडेजा करतोय कमबॅक! शेवटच्या सामन्यात दिसणार मैदानावर






