चीनच्या वुहान शहरातून आलेला कोरोना या महाभयानक विषाणूने जगभर थैमान घातला आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्वच वेळापत्रक कोलमडून गेले असून सर्व मालिका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
याच दरम्यान लॉक डाउन असल्याने काही क्रिकेटपटू आपल्या परिवारासोबत वेळ देता आहेत तर काहीजण घरीच राहून फिटनेस आणि सरावावरती भर देत असल्याचे सांगत आहेत.
तसेच खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात आहेत. याचदरम्यान फिरकीपटू हरभजन सिंग याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा एक मजेशीर व्हिडिओ फॅन्सबरोबर शेअर केला आहे.
सदरच्या व्हिडीओत सचिन तेंडुलकर हे त्यांच्या परसबागेतील झाडाचे लिंबू तोडत असल्याचे दिसून येत आहे. एक भला मोठा बांबू घेऊन सचिन तेंडुलकर झाडाचे लिंबू तोडत आहेत. याचदरम्यान व्हिडिओत पाठीमागून एक आवाज येतोय ज्यात सचिन तेंडुलकर आंबे तोडत आहात का? असे विचारतात. त्यावेळी सचिन म्हणतो की, हे आंबे नाहीत लिंबू असल्याचे सांगतो.
Paji 2/3 nimbu mere liye bi nikal lena @sachin_rt 🙏 #Greatman pic.twitter.com/XZfHUXTdkf
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) May 20, 2020
हा व्हिडिओ हरभजन सिंगने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरही ट्विट केला आहे आणि माझ्यासाठीही पाजी दोन-तीन लिंबू काढून ठेव असे सांगत आहे. हरभजन सिंगने ट्विट केलेला हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला. क्रिकेट फॅन्स व्हिडिओवर कमेंट्स देत आहेत.
यंदा आयपीएलचे सामने होत नसल्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या आपल्या परिवारासोबत आहे. नुकतेच सचिनने त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे केस कापतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आपल्या मुलांचे हेअरकट करत असतानाचा व्हिडिओ सचिनने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. सचिनचा हा व्हिडिओ देखील चाहत्यांना खूप भावला.