टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022चा अंतिम सामना रविवारी (13 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. यामध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) समोरासमोर येणार आहेत. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून दोन्ही संघाच्या खेळाडूंबरोबरच चाहतेही कधी एकदाचा सामना सुरू होतो याची वाट पाहत आहे, मात्र पाऊस त्यांचा हिरमोड करण्याची शक्यता आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी एक वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार आहे.
सकाळी ऊन पडले होते, मात्र दिवसभर पावसाची शक्यता स्थानिक हवामान विभागाने वर्तवली आहे. हा पाऊस केवळ आजच्याच दिवशी नाहीतर सोमवारीही (14 नोव्हेंबर) पडण्याची शक्यता आहे. आयसीसीने सांगितले की सामना रविवारी नाही झाला तर त्याच्यासाठी सोमवार रिजर्व-डे आहे, मात्र पावसाने यावरही पाणी फेरण्याचे निश्चित केले आहे. कारण दोन्ही दिवस मोठा पाऊस पडणार असेही सांगितले आहे. तसेच या स्पर्धेतील मागील काही सामाने रद्द झाले त्यातील बहुतेक सामनेच एमसीजीवरच खेळण्यात आले.
एमसीजीची खेळपट्टी चेंडू उसळी घेणारी असून येथे पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 167 आहे. सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघाना प्रत्येकी 10-10 षटके खेळण्याची आवश्यकता आहे. तसेच आयसीसीने प्रत्येकी 2-2 तास अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे.त्याचबरोबर दोन्ही दिवसांत काहीच निकाल लागला नाही तर संयुक्त विजेते घोषित केले जाणार आहेत.
हे दोन्ही संघ टी20 क्रिकेटमध्ये 28 सामन्यात एकमेंकाशी भिडले आहेत. त्यामध्ये इंग्लंड 18 सामने जिंकत आघाडीवर असून पाकिस्तानने केवळ 9 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकालच लागला नाही. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या टी20 विश्वचषकांमध्ये इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध दोन सामने जिंकले आहेत. हा विश्वचषक सुरू होण्याआधी इंग्लंडने पाकिस्तानचा दौरा केला आणि यजमान संघाला सात सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-3 असे पराभूत केले. pakveng rain on the final match find out melbourne weather and pitch report
दोन्ही संघाची संभाव्य इलेव्हन-
पाकिस्तान- मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.
इंग्लंड- जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर), ऍलेक्स हेल्स, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम कुरान, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हारलो म्हणून काय झालं, ऑस्ट्रेलियातून ‘एवढे’ कोटी घेऊन येणार भारतीय संघ; आकडा वाचून येईल आकडी
‘मातीशी नाळ जोडलेला व्यक्ती’, डिविलियर्सला मुंबईच्या रस्त्यावर चहा पिताना पाहून चाहत्याची लक्षवेधी कमेंट