शुक्रवारपासून (दि. 09 डिसेंबर) पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात पाकिस्तानकडून एका जबरदस्त फिरकी गोलंदाजाने पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या सामन्यात तो इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण उडवत आहे. त्याने त्याच्या कारकीर्दीतील पहिल्याच कसोटीत इतिहास रचला आहे. या बाबतीत त्याने पाकिस्तानी आणि भारतीय दिग्गजांनाही असा कारनामा करता आला नव्हता.
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (Pakistan vs England) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यात पहिली कसोटी जिंकत इंग्लंड संघ 1-0 ने आघाडीवर आहे. अशात मालिकेत बरोबरी करण्यासाठी बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाला हा सामना आपल्या खिशात घालावा लागेल. या सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंडने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला. 24 वर्षीय फिरकीपटू अबरार अहमद (Abrar Ahmed) याने इंग्लंडच्या फलंदाजांना ‘सळो की पळो’ करून सोडले. या पाचही विकेट्स अबरारने घेतल्या. इंग्लंडच्या बेन डकेट आणि ऑली पोप या दोघांना अर्धशतक करण्यात यश आले.
सामन्यात इंग्लंडने चांगली सुरुवात केली होती. एकेवेळी त्यांची धावसंख्या एक विकेट गमावत 117 धावा होती. यानंतर संघाने पुढील 4 विकेट्स 50 धावांवर गमावल्या. लंच ब्रेकपर्यंत संघाची धावसंख्या 33 षटकात 5 विकेट्स गमावत 180 इतकी होती. बेन स्टोक्स 14 धावांवर खेळत होता. पुढे लंच ब्रेकनंतर दोन विकेट्स पडल्या. यात बेन स्टोक्स (30) आणि विल जॅक्स (31) यांचा समावेश होता.
What a ball to get your first Test wicket! ????
Immediate impact by Abrar Ahmed ????#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/8tvnuGFzyo
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 9, 2022
अबरार अहमद विक्रम
यासह अबरार अहमद पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच सत्रात 5 विकेट्स घेणारा पाकिस्तानचा पहिला गोलंदाज बनला. पाकिस्तानचे माजी दिग्गज मुश्ताक अहमद यांच्यापासून ते भारतीय दिग्गज अनिक कुंबळे याच्यापर्यंत अशी कामगिरी कुणालाही करता आली नव्हती. विशेष म्हणजे, अबरारची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आकडेवारीही शानदार राहिली आहे.
तब्बल 4 फलंदाजांनी ठोकले होते शतक
पहिल्या कसोटीबद्दल बोलायचं झालं, तर इंग्लंडच्या 4 फलंदाजांनी शतक ठोकले होते. मात्र, अबरार अहमद याने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांना असे करण्यापासून रोखले. त्याने झॅक क्रॉले (19) याला त्रिफळाचीत करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर बेन डकेट (63), जो रूट (8), ऑली पोप (60), हेन्री ब्रूक (9) यांची विकेट घेत इतिहास रचला.
A debut to remember ????
Abrar Ahmed has a five-wicket haul in the first session!#PAKvENG | #WTC23 | https://t.co/OroPZVteRn pic.twitter.com/WbY3Z2rr9a
— ICC (@ICC) December 9, 2022
विशेष म्हणजे, अबरारव्यतिरिक्त पाकिस्तानचा गोलंदाज वहाब रियाज यानेही 2010मध्ये इंग्लंडविरुद्धच कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या दिवशी 5 विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता.
अबरारबद्दल थोडक्यात
अबरार हा त्याच्या भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. त्याने या सामन्यापूर्वी 14 प्रथम श्रेणी सामन्यात 26च्या सरासरीने 76 विकेट्स घेतल्या आहेत. यातील त्याची 40 धावा देत 6 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने 7 वेळा 5 आणि 2 वेळा 10 विकेट्स घेतल्या आहेत. आता कसोटीत तो विक्रम करताना दिसत आहे. (pak vs eng 2nd test bowler abrar ahmed took 5 wickets on debut test against england create history)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“त्याने भारतासाठी विराटसारखी कामगिरी करावी”; कार्तिकने या खेळाडूवर दाखवला विश्वास
शोएब मलिकचे बाबर आझम बदद्ल विधान; म्हणाला, ‘मला आतल्या गोष्टी माहिती..’






