पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात रविवारी (30 ऑक्टोबर) रोजी आमना सामना झाला. पाकिस्तानने टी-20 विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये लागोपाठ पराभव पत्करले होते. पण तिसऱ्या सामन्यात मात्र त्यांनी विजय मिळवला आहे. नेदरलंड्सविरुद्ध खेलताना त्यांना सोपे लक्ष्य मिळाले होते, जे पाकिस्तानने 14 षटकांमध्ये गाठले. पाकिस्तानसाठी त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान सर्वात्तम प्रदर्शन करू शकला. रिजवानचा एक व्हिडिओ आयसीसीने पोस्ट केली आहे, ज्यामध्ये चाहत्यांना त्याच्या शर्टच्या कॉलरवर एक खास बिल्ला दिसत आहे.
आयसीसी आणि टी-20 विश्वचषकाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) याचा हा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. चाहत्यांना त्याच्या शर्टच्या कॉलरवर लावलेला बिल्ला नक्की आहे तरी कशाचा? हा प्रश्न पडला आहे. यावर्षी खेळल्या गेलेल्या आशिया चषक 2022 मध्ये रिजवान चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता. तसेच आशिया चषकापूर्वी इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या टी-20 मालिकेत देखील त्याने चांगली कामगिरी केली होती. याच प्रदर्शनासाठी रिजवान सप्टेंबर 2022 मध्ये आयसीसी प्लेअर ऑफ द मंध पुरस्काराचा मानकरी ठरला होता. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात त्याने लावलेला बिल्ला हा त्याला सप्टेंबर महिन्यातील कामगिरीसाठी आयसीसीकडून दिला गेला होता.
https://www.instagram.com/reel/CkVU2t_pK8O/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर नाणेफेक जिंकून नेदरलँड्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. परंतु कर्णधाराने घेतलेला निर्णय नेदरलँड्सचे फलंदाज योग्य ठरवू शकले नाहीत. मर्यादित 20 षटकांमध्ये नेदरलँड्सने 9 विकेट्सच्या नुकसानावर 91 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 4 विकेट्सच्या नुकसानावर 13.5 षटकांमध्ये हा सामना जिंकला. पाकिस्तान संघाचा टी-20 विश्वचषक 2022 मधील हा पहिलाच विजय ठरला. पाकिस्तानने विश्वचषकातील पहिले दोन सामने अनुक्रमे भारत आणि झिम्बाब्वे संघांविरुद्ध गमावले आहेत.
गुणतालिकेचा विचार केला, तर पाकिस्तान ग्रुप दोनमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत. ग्रुप दोनमध्येच सहभागी असलेला भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान संघाच्या उपांत्य सामन्यात पोहोचण्याच्या आशा रविवारी मावळल्या. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतकर पाकिस्तान उपांत्य सामन्याच्या शर्यतीतून बाहेर पडला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कार्तिकची दुखापत गंभीर! बांगलादेशविरुद्ध पंत होणार प्लेईंग इलेव्हनमध्ये ‘इन’
भारत-पाकिस्तानसह हा देश खेळणार तिरंगी मालिका; नियोजनही झाले सुरु