चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पाकिस्तानचे सलामीवीर फलंदाज स्वस्तात बाद झाले. पण तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार बाबरने अर्धशतकी खेळी केली आणि संघाला सुस्थितीत पोहोचवले. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर आलेल्या सौद शकील यानेही अर्धशतकी खेळी खेली आणि संघाची धावंख्या समाधानकारक बनवली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तान संघ 46.4 षटकांमध्ये 270 धावा करून सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेा विजयासाठी 271 धावांची आवश्यकता आहे.
पाकिस्तानसाठी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने 65 चेंडूत 50 धावांची खेली केली. तसेच सौद शकील पाकिस्साठी दुसरा अर्धशतक करणारा ठरला. शकीलने 52 चेंडूत 52 धावा केल्या. शादाब खान याने 36 चेंडूत 43 धावांची महत्वपूर्ण योगदान दिले. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघासाठी तबरेझ शम्सी याने 10 षटकात 60 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मार्को जेन्सन याने 9 षटकांमध्ये 43 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. तसेच जेराल्ड कोएट्झी याने 2, तर लुन्गी एनगिडी याने एक विकेट घेतली. (South Africa needs 271 runs to defeat Pakistan)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, शादाब खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हरिस रौफ
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, जेराल्ड कोएट्झी, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एन्गिडी.
महत्वाच्या बातम्या –
‘हा शानदार संघ, शहाण्यांना…’, वर्ल्डकप 2023चा वर्ल्डकप जिंकण्याविषयीच्या प्रश्नावर धोनीचे विधान
छोटेखानी खेळीत रिझवानचा मोठा पराक्रम, वनडे करिअरमध्ये पार केला मैलाचा दगड; वाचा बातमी