---Advertisement---

विश्वचषक २०१९: विंडीज विरुद्ध पाकिस्तान सामन्यात झालेले ५ विक्रम

On: शनिवार, जून 1, 2019 12:29 PM
---Advertisement---

नॉटिंगघम। शुक्रवारी(31 मे) 2019 विश्वचषकातील दुसरा सामना विंडीज विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. ट्रेंट ब्रिजवर पार पडलेल्या या सामन्यात विंडीजने 7 विकेट्सने विजय मिळवला.

केवळ 35.2 षटकांमध्ये संपलेल्या या सामन्यात या सामन्यात पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना 21.4 षटकात सर्वबाद 105 धावाच करता आल्या. विंडीजकडून गोलंदाजीत ओशान थॉमसने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तसेच कर्णधार जेसन होल्डरने 3 विकेट्स, आंद्रे रसलने 2 विकेट्स आणि शेल्डन कॉटरेलने 1 विकेट घेतली.

त्यानंतर 106 धावांच्या आव्हानाचा पाठलाग विंडीजने ख्रिस गेलच्या अर्धशतकाच्या जोरावर 13.4 षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केला. गेलने 34 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 50 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून गोलंदाजीत मोहम्मद अमीरने तीन विकेट्स घेतल्या.

या सामन्यात झालेले हे काही विक्रम – 

#चेंडू बाकी ठेवण्याच्या तुलनेतील पाकिस्तानचा वनडेमधील सर्वात मोठे पराभव – 

225 चेंडू बाकी – विरुद्ध विंडीज (केपटाऊन, 1993)

218 चेंडू बाकी – विरुद्ध विंडीज (नॉटिंगघम, 2019)*

#पाकिस्तानचा वनडे क्रिकेटमधील सलग 11 व्या सामन्यात पराभव. 

– पाकिस्तानचे सर्वाधिक सलग वनडेमध्ये झालेले पराभव –

11 पराभव – जानेवारी 2019 – मे 2019*

10 पराभव – ऑक्टोबर 1987 – मार्च 1988

9 पराभव – नोव्हेंबर 2009 – जून 2010

#विश्वचषकात विंडीजने चेंडू राखून मिळवलेले सर्वात मोठे विजय –

239 चेंडू – विरुद्ध स्कॉटलँड, 1999

236 चेंडू – विरुद्ध श्रीलंका, 1975

226 चेंडू – विरुद्ध बांगलादेश, 2011

218 चेंडू – विरुद्ध पाकिस्तान, 2019*

177 चेंडू – विरुद्ध कॅनडा, 2003

#वनडे मध्ये सलग 6 डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा ख्रिस गेल विंडीजचा दुसराच खेळाडू. याआधी असा कारनामा गॉर्डन ग्रीनीज यांनी केला होता. त्यांनी 1979-1980 च्या दरम्यान सलग सहा वनडे डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

– वनडेमध्ये सर्वाधिक सलग डावात 50 पेक्षा अधिक धावा करणारे क्रिकेटपटू – 

9 डाव – जावेद मियाँदाद, 1987

6 डाव  – गॉर्डन ग्रीनीज, 1979-80

6 डाव – अँड्र्यू जोन्स, 1988-89

6 डाव – मार्क वॉ, 1999

6 डाव – मोहम्मद युसुफ, 2003

6 डाव – केन विलियम्सन, 2015

6 डाव – रॉस टेलर , 2018-19

6 डाव – ख्रिस गेल, 2018-19*

#वनडे विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू – 

40 षटकार – ख्रिस गेल*

37 षटकार – एबी डिविलियर्स

31 – रिकी पँटिंग

29 – ब्रेंडन मॅक्यूलम

28 – हर्षल गिब्स

27 सनथ जयसुर्या/सचिन तेंडुलकर

#विश्वचषकातील पाकिस्तानची सर्वात कमी धावसंख्या –

74 धावा – विरुद्ध इंग्लंड, ऍडलेड, 1992

105 धावा – विरुद्ध विंडीज, नॉटिंगघम, 2019*

132 धावा – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लॉर्ड्स, 1999

132 धावा – विरुद्ध आयर्लंड, किंग्सस्टन, 2007

134 धावा – विरुद्ध इंग्लंड, केपटाऊन, 2003

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वचषक २०१९: पहिल्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियासाठी ही आहे आनंदाची बातमी

तुफानी फॉर्ममध्ये असणाऱ्या ख्रिस गेलचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश

‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलच आहे विश्वचषकातील षटकार किंग, जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment