काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने २०२२च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील खेळाडूंबद्दल भाकीत केले होते आणि म्हटले होते की, भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध खेळणार आहे. पाँटिंगच्या या खास अंदाजानंतर आता पाकिस्तानचा माजी दिग्गज आणि कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही त्याच्या वतीने टी-२० विश्वचषकाबाबत भविष्यवाणी केली आहे.
पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर आपले मत मांडले आहे. यावेळी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचा संघ टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणार असल्याचे आफ्रिदीने मान्य केले आहे. शेवटी चॅम्पियन कोण होणार हे आफ्रिदीने सांगितले नसले तरी अंतिम फेरीतील स्पर्धकांबाबत निश्चितच भाकीत केले आहे.
याशिवाय आफ्रिदीने विराट कोहलीच्या फॉर्मबद्दलही बोलले आणि सांगितले की, “कोहलीला आणखी धावा कराव्या लागतील. प्रत्येकाला त्याच्याकडून आशा आहेत. कोहलीच्या आत जो जोश पुन्हा नंबर वन व्हायचा, तो उरला आहे का?” असं म्हणत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीला लक्ष्य केले. शिवाय त्याच्या खराब फॉर्मचा फटका भारताला आगामी टी-२० विश्वचषकात बसेल असे भाकितही वर्तवले.
खरंतर अलीकडच्या काळात विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. त्यामुळेच चाहते आणि समीक्षक विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल सतत चर्चा करत असतात. आता कोहली आशिया कप २०२२मध्ये भारतीय संघात सामील होणार आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतासाठी विराट कोहली हे सर्वात महत्वाचे नाव आहे. शिवाय यावर्षी या दोन्ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर २०२३ साली वनडे विश्वचषक भारतात होणार आहे. त्यासाठी भारतीय संघाला विराट कोहलीची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे विराट कोहलीने लवकरात लवकर फॉर्ममध्ये परतणे हे केवळ त्याच्या वैयक्तिक नव्हे तर संघाच्या भवितव्यासाठीही गरजेचे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘पाकिस्तानच्या चुकांची पुनरावृत्ती सध्या टीम इंडिया करत आहे’, माजी दिग्गजाचा दावा
मॅचही गेली आणि पैसेही! पहिल्या टी२०तील पराभवानंतर आयसीसीकडून वेस्ट इंडिजवर कारवाई
पाकिस्तानला झटका देण्यासाठी भारताची रणनिती बदलली, हरमनप्रीत उचलणार मोठे पाऊल