---Advertisement---

टीम इंडियाबरोबर एशिया कपमध्ये दोन हात करण्यासाठी पाक संघाची घोषणा, पाहा संपुर्ण संघ

On: बुधवार, ऑगस्ट 3, 2022 3:25 PM
Shaheen Afridi & Babar Azam
---Advertisement---

नुकतीच मंगळवारी (२ ऑगस्ट) बीसीसीआय सचिव जय शहा यांनी आशिया चषक २०२२चे वेळापत्रक जाहीर केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच बुधवारी (३ ऑगस्ट) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आशिया चषक टी-२० आणि नेदरलँड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. यासंघात बाबर आझम पाकिस्तानचे नेतृत्व करताना दिसणार आहे. याशिवाय पीसीबीने आशिया चषकासाठी १५ जणांचा संघ जाहीर केला आहे.

यूएई येथे होणाऱ्या आगामी टी-२० आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानने आपला मजबूत संघ जाहीर केला आहे. आशिया चषकात पाकिस्तानचा पहिला सामना रविवारी २८ ऑगस्ट रोजी भारताविरुद्ध होणार आहे. शिवाय स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी संघ नेदरलँडविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा दोन्ही संघात समावेश करण्यात आला आहे आणि नुकताच गेल्या महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकल्यानंतर नेदरलँड्सविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेदरम्यान तो पुन्हा मैदानात उतरणार आहे.

दोन्हीकडे बाबर आझम पुन्हा एकदा पाकिस्तानची धुरा सांभाळणार आहे, तर सहकारी वेगवान गोलंदाज हसन अलीच्या जागी वेगवान गोलंदाज नसीम शाहचा संघात समावेश करण्यात आला आहे.  पाकिस्तान संघ १६, १८ आणि २१ ऑगस्ट रोजी नेदरलँड्सविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात तीनदा सामना होऊ शकतो
भारत, पाकिस्तान आणि क्वालिफायर संघाला अ गटात ठेवण्यात आले आहे, तर ब गटात यजमान श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. सर्व सामने स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता सुरू होतील. या स्पर्धेतील १० सामने दुबई तर तीन सामने शारजाह येथे खेळवले जातील. या स्पर्धेचे वेळापत्रक पाहता भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकूण तीन वेळा आमनेसामने येऊ शकतात हे स्पष्ट होते. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांची गटातील लढतींनंतर सुपर-४ आणि त्यानंतर अंतिम फेरीतही आमने-सामने होण्याची शक्यता आहे.

नेदरलँड्स वनडेसाठी पाकिस्तान संघ:
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हॅरिस रौफ, इमाम-उल-हक, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी, शाहनवाज दहानी, जाहिद महमूद

आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ:
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी , शाहनवाज डहानी, उस्मान कादिरी

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

सूर्या का आला ओपनिंगला? कॅप्टन रोहितनेच केला खुलासा

‘तू भारताचा हार्दिक पंड्या झाला आहेस का?’ पत्रकाराच्या प्रश्नावर भारतीय अष्टपैलूचे दिलखुलास उत्तर

सहा चेंडूत ३४ धावा कुटणाऱ्या ‘या’ फलंदाजाकडे एकेकाळी शूज घ्यायलाही नव्हते पैसे, जुने ट्वीट व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---