---Advertisement---

‘तो 60 डिग्रीपण नाहीये, घं***चा किंग’, सूर्याची कॉपी करणारा बाबर आझम नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोल

Babar-Azam
---Advertisement---

जागतिक क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू होते आणि आजही आहेत, ज्यांनी मैदानावर पाऊल ठेवताच, त्यांच्याकडून मोठमोठ्या फटक्यांची अपेक्षा केली जाते. त्या खेळाडूंमध्ये एबी डिविलियर्स आणि सूर्यकुमार यादव यांच्या नावाचाही समावेश होतो. हे दोघेही मैदानात चारही दिशेला फटके मारण्यासाठी ओळखले जातात. डिविलियर्सला ‘मिस्टर 360‘ म्हटले जाते. त्यानंतर सूर्याची फलंदाजी पाहून चाहते त्यालाही ‘मिस्टर 360’ म्हणू लागलेत. अनेक खेळाडू त्याचे शॉट कॉपी करण्याचा प्रयत्नही करतात. असेच काहीसे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने करण्याचा प्रयत्न केला, पण हे त्याला चांगलेच महागात पडले. सूर्यकुमारच्या चाहत्यांनी त्याला जोरदार ट्रोल केले आहे.

बाबर आझमचा व्हिडिओ व्हायरल
पाकिस्तान संघाचा धुरंधर फलंदाज बाबर आझम (Babar Azam) याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत बाबर नेट्समध्ये सराव करताना दिसत आहे. यावेळी तो वेगवेगळे फटकेही मारताना दिसत आहे. बाबरने यावेळी एक असा शॉट मारण्याचा सराव केला, जो ‘मिस्टर 360 डिग्री’ नावाने प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने अनेकदा मारून दाखवला आहे. यामुळे काही चाहत्यांनी त्याची प्रशंसाही केली आहे, पण सूर्यकुमारच्या चाहत्यांनी बाबरला ट्रोल केले आहे.

बाबरला म्हटले ‘नवीन मिस्टर 360’
पाकिस्तान क्रिकेटने बाबर आझमचा व्हिडिओ अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी “बाबर आजम, नवीन मिस्टर 360” असे लिहिले आहे.

ट्रोल होतोय बाबर आझम
हा व्हिडिओ व्हायरल होताच सूर्यकुमार यादव याच्या चाहत्यांनी कमेंट करत बाबर आजमला ट्रोल केले आहे. एका युजरने लिहिले की, “जरा तरी लाज वाटू द्या.” दुसरा एक युजर म्हणाला की, “स्वस्त कॉपी.” आणखी एकाने लिहिले की, “मिस्टर 360 डिग्री फक्त एकच आहे आणि तो सूर्यकुमार यादव आहे.” एका चाहत्याने बाबरला ट्रोल करत म्हटले की, “तो 60 डिग्रीपण नाहीये, घं***चा किंग.” एकाने असेही म्हटले की, “इतका सावकाश चेंडू कोण टाकणार आहे?” एबी डिविलियर्सचे नाव घेत एकजण म्हणाला की, “तिकडे एबी डिविलियर्स बेशुद्ध पडलाय भाईजान.”

https://twitter.com/mahesshdev/status/1621823486464491520

खरं तर, सूर्यकुमारलाही ‘मिस्टर 360’ म्हटले जाते. कारण, तो मैदानात चारही बाजूला फटके मारू शकतो. टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार याच्या नावावर 3 आंतरराष्ट्रीय शतकेदेखील आहेत. (pakistan captain babar azam copying suryakumar yadav shot 360 degree see video fans trolled him)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हनुमा विहारीला स्वत:चं करिअर घालायचंय धोक्यात? धक्कादायक खुलासा करत म्हणाला, ‘यानंतर क्रिकेट खेळता…’
तब्बल 5 महिन्यांनंतर संघात पुनरागमन करताच ‘जड्डू’चा मोठा खुलासा; म्हणाला, ‘सर्जरी केली नसती तरी…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---