---Advertisement---

एकच लक्ष्य, आशिया चषक फक्त; अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची हुंकार

Babar-Azam
---Advertisement---

आशिया चषक 2022चा अंतिम सामना रविवारी (11 सप्टेंबर) रंगणार आहे. या सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तान संघ आमने सामने असतील. श्रीलंका संघाकडे सहाव्यांदा तर पाकिस्तान संघाकडे तिसऱ्यांदा आशिया चषक जिंकण्याची संधी असेल. या महत्वपूर्ण सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आझमचा व्हिडिओ शेअर केला आहे. पाकिस्तानचा संघ विजेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर असल्याचे आझमने म्हटले आहे.

अंतिम सामन्यापूर्वी सुपर-4 फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंका संघांची भिडंत झाली होती. या सामन्यात श्रीलंका संघाने पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. यानंतर पाकिस्तानचे खेळाडू थोड्याफार दबावाखाली असणे साहजिक आहे. परंतु आझमने पाकिस्तानचा संघ पूर्ण आत्मविश्वासासह मैदानावर उतरेल आणि विजय मिळवून परतेल, अशी हुंकार भरली आहे.

आझम म्हणाला की, “प्रत्येक कर्णधार आणि खेळाडूचे स्वप्न असते की, त्यांनी किताब जिंकावा. एका संघ म्हणून आम्ही विजेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहोत. आमचा हेतू फक्त चांगले प्रदर्शन करत स्पर्धा जिंकणे हाच आहे. या स्पर्धेत मागील काही दिवसांत आम्ही चांगले प्रदर्शन केले आहे. काही सामने आमच्यासाठी फार कठीणही राहिले, जिथे खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केले. काही खेळाडू काही सामन्यात चमकले आहेत आणि मॅच विनिंग प्रदर्शनासह सामनावीर बनले आहेत.”

“एक संघ बनवताना नेहमी हे डोक्यात ठेवून निवड करावी लागते की, संघात किती खेळाडू आहेत, जे नानाविध प्रकारे संघाला सामना जिंकून देण्यात मदत करतील. एका कर्णधाराच्या नाते माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे की, मी संघाचे साहाय्य करू. आणि त्यांच्यासाठी भविष्यातील यशासाठी रस्ता तयार करू”, असेही पुढे आझमने म्हटले.

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, आसिफ अली, खुशदिल शाह, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: नेहमी भारताला नडणाऱ्या आफ्रिदीच्या मुलीने फरडकावला भारताचा तिरंगा! स्वत: केलाय मोठा खुलासा
पहिल्याच सामन्यात चाहत्यांनी अनुभवले इरफानचे जुने रुप, सोशल मीडियावर होतंय कौतुक
स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---