---Advertisement---

आता क्रिकटर्सला रहावे लागणार पत्नींपासून दूर; बोर्डाने सांगितले कारण…

---Advertisement---

कोरोना व्हायरसने संपूर्ण क्रीडा जगताला हादरून सोडले आहे. या व्हायरसमुळे अनेक क्रिकेट बोर्डांवर आर्थिक संकट ओढावले आहे. परंतु क्रीडा जगतासाठी मागील काही दिवसांपासून सकारात्मक बातमी येत आहे. पुढील महिन्यात कोरोना व्हायरसनंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यात येणार आहे.

वेस्ट इंडीजचे (West Indies) यजमानपद स्विकारल्यानंतर इंग्लंड (England) पाकिस्तानचेही यजमानपद स्विकारणार आहे. इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये ३० जुलैपासून ३ सामन्यांची कसोटी आणि ३ सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका खेळण्यात येणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेटपटूंसाठी पाकिस्तान क्रिकेेट बोर्डाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर खेळाडू आणि अधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या कुटुंबियांना जाण्याची परवानगी देणार नाही. कारण कोरोना व्हायरसमुळे अतिरिक्त खबरदारी घेतली जात आहे.

२९ खेळाडू जाणार इंग्लंडला

इंग्लंड क्रिकेट बोर्ड (England Cricket Board) विशेष चार्टर्ड विमानावर जवळपास ५ कोटी रुपये खर्च करत आहे. ज्यामुळे २९ खेळाडू आणि १४ अधिकारी पाकिस्तानवरुन इंग्लंडला जाणार आहेत.

पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले, बोर्डाने खेळाडूंना स्पष्टपणे सांगितले आहे, की त्यांचे कुटुंब म्हणजेच पत्नी, मुले सर्व त्यांच्याबरोबर जाऊ शकत नाहीत. कारण तिथे जाऊन त्यांना वेगळे रहावे लागेल. सप्टेंबरपर्यंत दौरा संपेपर्यंत संपूर्ण संघ आपल्या कुटुंबाला भेटू शकणार नाही.

खेळाडूंना सांगण्यात आले आहे, की इंग्लंडमध्ये पोहोचताच त्यांना बर्मिंघममध्ये १४ दिवसांसाठी क्वारंटाईन (Quarantine) रहावे लागणार आहे. यानंतर मॅनचेस्टरमध्ये ते ४ आठवडे जैविक सुरक्षित वातावरणात सराव करतील. या मालिकेच्या प्रसारण कमाईतून ईसीबीला ७ अब्ज रुपयांहून अधिक रकमेची अपेक्षा असल्याचेही सूत्राने सांगितले.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी (१५ जून) राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी परवानगी दिली आहे. पीसीबीचे अध्यक्ष एहसान मनी यांनी यापूर्वी इस्लामाबादमध्ये इम्रान यांची भेट घेतली आणि क्रिकेटबद्दल माहिती दिली.

इम्रान हे पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार होते.

ट्रेंडिंग घडामोडी-

-मोठी बातमी: टीम इंडिया ऑक्टोबरमध्ये नाही जाणार ‘या’ देशाच्या दौऱ्यावर

-कोवि़ड-१९ दरम्यान आयपीएल झाल्यास बनू शकतो खूप मोठा विक्रम!

-‘मी आशा करतो की चीनी सुधारतील’; विरेंद्र सेहवाग भडकला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---