सध्या पाकिस्तान क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेत आला आहे. पाकिस्ताननं विश्वचषकात अद्याप एकही सामना खेळलेला नाही, मात्र त्याआधीच संघ मोठ्या वादात सापडला आहे. दावा केला जात आहे की, पाकिस्तानी संघानं एका खासगी डिनरचं आयोजन केलं होतं, जिथे त्यांनी चाहत्यांना भेटण्यासाठी 25 डॉलर्स आकारले होते. खुद्द पाकिस्तानचा माजी खेळाडू रशीद लतीफ यानं याचा खुलासा केला आहे.
पाकिस्तान संघाला टी20 विश्वचषक 2024 मध्ये पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी त्यांनी एका खासगी डिनरचं आयोजन केलं होतं. या डिनरमध्ये चाहत्यांनाही भेटण्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र चाहत्यांची एंट्री मोफत नव्हती. पाकिस्तानी खेळाडूंना भेटण्यासाठी चाहत्यांकडून 25 डॉलर्स आकारण्यात आले.
पाकिस्तानचा माजी खेळाडू रशीद लतीफ यानं त्याच्या यूट्यूब चॅनलवर याचा खुलासा करत संघावर टीका केली आहे. 2 जून रोजी या खासगी डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याला ‘मीट अँड ग्रीट’ असं नाव देण्यात आलं होतं. रात्री साडेअकरा वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू होता.
रशीद लतीफ यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर झालेल्या संवादादरम्यान याबाबत सांगितलं. ते म्हणाले, “हे पाकिस्तानचं खासगी डिनर होतं. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. याचा अर्थ असा की तुम्ही 25 डॉलर्समध्ये आमच्या खेळाडूंना भेटलात. काही गडबड झाली तर लोक म्हणतील की ते अशाप्रकारे पैसे कमवतात. लोक मला सांगतात की, जो कोणी पाकिस्तानी खेळाडूंना फोन करतो, तर ते विचारतात किती पैसे देणार? ही सामान्य बाब झाली आहे. आजकाल असं कोण जातं? आमचा काळ वेगळा होता. दोन-तीन डिनर अधिकृत असतात. विश्वचषकादरम्यान अशा गोष्टी उघडकीस आल्या. तुम्ही तुमच्या मित्रांकडे जा, मात्र त्यात पैशांचा समावेश नसावा.”
Let’s Save The Star & Be Stars
Unofficial Private Dinner During WC24#T20WorldCup pic.twitter.com/BXEgPyA2p2— Rashid Latif | 🇵🇰 (@iRashidLatif68) June 4, 2024
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची संधी, धोनीला मागे टाकून बनेल भारताचा नंबर-1 कर्णधार
शिवम दुबेची तुलना चक्क कपिल देव यांच्याशी! सीएसकेच्या कोचचं धक्कादायक वक्तव्य
वर्ल्डकप विजेत्या माजी क्रिकेटपटूचा लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय, तिसऱ्यांदा बनले खासदार