Pakistan Cricket Team Problems: सध्या पाकिस्तान क्रिकेट वाईट दिवसांचा सामना करत आहे. पाकिस्तानचा वरिष्ठ संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, तर 19 वर्षांखालील आशिया चषकासाठी पाकिस्तानचा ज्युनिअर संघ यूएईत पोहोचला आहे. अशातच धक्कादायक माहिती समोर येत आहे की, पाकिस्तानच्या एका संघाकडे कोणताही डॉक्टर नाहीये, तर दुसरा संघ मॅनेजरशिवाय खेळत आहे. 1992 चा विश्वचषक विजेता पाकिस्तान संघावर एवढी वाईट वेळ आली आहे.
वरिष्ठ संघासोबत नाही डॉक्टर
व्हिसा आणि पासपोर्टशी संबंधित कारणांमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानच्या वरिष्ठ संघाकडे कोणताही डॉक्टर (Pakistan Senior Team in Australia without Doctor) नाहीये. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी सोहेल सलीम (Sohail Saleem) यांना संघाचा अधिकृत डॉक्टर (Doctor) म्हणून निवडले होते. मात्र, ते अद्याप संघासोबत जोडले गेले नाहीयेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले की, “पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) अजूनही डॉक्टर सलीम यांच्यासाठी व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिसा मिळाल्यानंतरच ते पर्थमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात संघाशी जोडले जातील.”
मॅनेजरशिवाय ज्युनिअर संघ
एवढंच नाही, तर 19 वर्षांखालील पाकिस्तान संघ मॅनेजरशिवाय संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईत पोहोचला आहे. वृत्तांनुसार, सूत्रांनी म्हटले की, यूएईतील 19 वर्षांखालील आशिया चषकासाठी माजी कसोटी फलंदाज शोएब मोहम्मदला पाकिस्तानच्या ज्युनिअर संघाचा मॅनेजर म्हणून नेमले होते. मात्र, तोदेखील संघासोबत जाऊ शकला नाही.
News About Pakistan Cricket Team :-
According to reports – the Pakistan team is touring Australia without a doctor due to issues related to the availability of a doctor, visa, and passport. pic.twitter.com/ARJZel5j2B
— Jay. (@Jay_Cricket18) December 10, 2023
पाकिस्तान ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार कसोटी मालिका
पाकिस्तान क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचला आहे. अशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या सामन्यांचे वेळापत्रक पाहायचे झाले, तर उभय संघातील पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर यादरम्यान पर्थ येथे खेळला जाणार आहे. तसेच, दुसरा सामना 26 ते 30 डिसेंबरदरम्यान मेलबर्न येथे खेळला जाईल. त्यानंतर मालिकेतील अखेरचा सामना 3 ते 7 जानेवारी यादरम्यान सिडनी येथे खेळला जाईल. (pakistan cricket team in australia without a doctor and without manager in sri lanka asia cup)
हेही वाचा-
‘मी कधीच ते पिण्याचा प्रयत्न केला नाही…’, गौतम गंभीरचा ‘त्या’ गोष्टीविषयी मोठा खुलासा
WPL 2024: लिलावातील 1 कोटी 30 लाख रुपयांतून आई-वडिलांसाठी ‘ही’ गोष्ट करणार Vrinda Dinesh, वाचून अभिमानच वाटेल