पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांच्याविषयी धक्कादायक बातमी समोर येत आहे. तोसाखाना प्रकरणात न्यायालयाने इम्रान खान यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याव्यतिरिक्त इम्रान यांच्या राजकीय कारकीर्दीवरही मोठा परिणाम झाला आहे. त्यांना तब्बल 5 वर्षांसाठी राजकारणातून अपात्र घोषित केले आहे. इस्लामाबादमधून येत असलेल्या या वृत्तानुसार, पीटीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान खान यांना निवडणूक लढवण्यातही अपात्र घोषित केले आहे. तसेच, त्यांना लाहोर येथून अटकही करण्यात आली आहे.
तीन वर्षांची शिक्षा, एक लाखाचा दंड
तोशाखाना प्रकरणात इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर तब्बल 1 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. दंड भरला नाही, तर त्यांना 6 महिन्यांच्या अतिरिक्त तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागेल. इस्लामाबाद पोलिसांना इम्रान खान यांचे अटक वॉरंट मिळाले आहे. न्यायालयाचा निर्णय येताच इस्लामाबाद पोलीस प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली. माध्यमांतील वृत्तांनुसार, तोशाखाना प्रकरणात न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आयजी इस्लामाबादला त्यांना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले होते, ज्यावर कारवाई करत इम्रान खानवर यांना अटक केली.
काय आहे नेमकं प्रकरण?
पाकिस्तानमध्ये तोशाखाना एक सरकारी विभाग आहे. यामध्ये इतर सरकारचे प्रमुख व्यक्ती आणि परदेशी व्यक्तींद्वारे राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार, नोकरदार आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटवस्तू ठेवल्या जातात. इम्रान यांच्यावर पंतप्रधान असताना तोशाखान्यात ठेवलेल्या भेटवस्तू कमी किमतीत खरेदी करणे आणि त्यानंतर विकून पैसा कमावण्याचा आरोप लावण्यात आला होता. मात्र, इम्रान खान यांना 2018मध्ये पंतप्रधान म्हणून यूरोप आणि अरब देशांच्या दौऱ्यादरम्यान अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. अशा अनेक भेटवस्तू इम्रान खान यांनी सरकारी विभागाला माहिती दिली नव्हती. त्यांच्यावर महागड्या भेटवस्तू बाहेर जाऊन विकल्याचा आरोप होता.
‘या’ भेटवस्तूंमुळे माजलेली खळबळ
माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी निवडणूक आयोगाला सांगितले होते की, भेटवस्तू विकून त्यांना जवळपास 5.8 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. या भेटवस्तूंमध्ये एक ग्रॅफ घड्याळ, एक महागडा पेन आणि 4 रोलेक्स घड्याळांचे प्रकरण सर्वात चर्चेत होते.
इम्रान खान यांची कारकीर्द
पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांनी त्यांच्या कारकीर्दीत पाकिस्तानकडून एकूण 88 कसोटी आणि 175 वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत त्यांनी 37.69च्या सरासरीने 3807 धावा केल्या. यामध्ये 6 शतक आणि 18 अर्धशतकांचा समावेश होता. तसेच, वनडेत त्यांनी 33.41च्या सरासरीने 3709 धावा केल्या. यामध्ये 1 शतक आणि 19 अर्धशतकांचा समावेश होता. (pakistan former captain imran khan sentenced to three years imprisonment)
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ एका विकेटने पलटला आख्खा सामना, माजी दिग्गजाने सांगूनच टाकले भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण
विराटने ज्या गोलंदाजाला चोपले, कार्तिकने त्याचेच गायले गोडवे; म्हणाला, ‘तो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट…’