लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडलेला आयपीएल 2023चा 43वा सामना चांगलाच चर्चेत राहिला. या सामन्यात बेंगलोरने लखनऊला 18 धावांनी नमवले. या सामन्यात बेंगलोर संघाने लखनऊला 126 धावांचे लहान आव्हान दिले होते, जे पार करण्यात लखनऊ संघ अपयशी ठरला. संपूर्ण संघ फक्त 108 धावाच करू शकला. मात्र, सामन्यानंतर विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात वाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर हे दोघेही भिडले. या वादाची चर्चा भारतभर झालीच, पण शेजारच्या पाकिस्तान देशातूनही यावर प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने नवीन उल हकला पाठिंबा दिला. तसेच, मोठे विधान केले आहे.
शाहिद आफ्रिदीचे वक्तव्य
शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) म्हणाला की, “नवीन उल हक तेव्हाच प्रतिक्रिया देतो, जेव्हा विनाकारण त्याला कुणी उकसवते. मी त्याला गोलंदाजी करताना पाहिले आहे. तो स्वत: आधी भांडण सुरू करत नाही. मी त्याला कधीच एवढं आक्रमक होताना पाहिलं नाहीये. प्रत्येक संघाकडे काही आक्रमक खेळाडू असतात. आमच्याडेही आहेत आणि हे सामान्य आहे. काही वेगवान गोलंदाज या स्वभावाचे असतात.”
आफ्रिदीशीही भिडलाय नवीन
नवीन उल हक (Naveen ul Haq) हा लंका प्रीमिअर लीगदरम्यान मोहम्मद आमिर याच्यासोबत भिडला होता. आमिरने त्याच्या चेंडूवर षटकार मारला होता. त्यामुळे नवीन भडकला होता. त्यावर त्याने सामन्यानंतर खेळाडूंशी हातही मिळवला नव्हता. त्यामुळे नवीन आणि शाहिद आफ्रिदी यांच्यातही बाचाबाची झाली होती. आता त्याच आफ्रिदीने नवीनची बाजू घेतली आहे.
सामन्यात काय झालेलं?
लखनऊ विरुद्ध बेंगलोर सामन्यानंतर हातमिळवणी करताना विराट कोहली (Virat Kohli) याचा हात नवीन उल हक झटकतो. त्यानंतर तो रागात विराटला काहीतरी म्हणताना दिसतो. त्यानंतर विराट जेव्हा लखनऊचा फलंदाज काईल मेयर्सशी बोलत असतो, तेव्हा गौतम गंभीर तिथे येतो आणि मेयर्सला तिथून घेऊन जातो. त्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर (Virat Kohli And Gautam Gambhir) यांच्यातही शाब्दिक चकमक घडते. (pakistan former cricketer shahid afridi support for naveen ul haq in fight with virat kohli lsg vs rcb ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video : जडेजाने टाकला IPLमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम चेंडू, दांड्या उडताच स्टॉयनिसला 440 व्होल्टचा शॉक
हरभजन सिंगची मोठी भविष्यवाणी! ‘हे’ चार संघ करतील प्ले-ऑफमध्ये एन्ट्री, मुंबईचाही समावेश