पाकिस्तानमध्ये जलद गोलंदाज भरभरून आहेत. कुठल्याही काळात असो पाकिस्तानकडे जलद गोलंदाजांचा ताफा असतोच. वसीम अक्रम, (Wasim Akram) इमरान खान, (Imran Khan) वकार युनिस (Waqar Younis) यांच्यापासून सुरु झालेला यादीत आता एक नवीन खेळाडू सामील आला आहे. तो खेळाडू आहे मोहम्मद वसीम जुनिअर (Mohammad Wasim Junior).
२० वर्षीय वासीमला आपण पाकिस्तानचा नवा यॉर्कर किंग म्हणू शकतो. कारण त्याने वेस्टइंडीज विरुद्ध पहिल्या टी-२० मध्ये आक्रमक गोलंदाजी करून यॉर्करवर फलंदाजांना बाद केलं. त्यामुळे आता क्रिकेटमध्ये एक नवा यॉर्कर किंग आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (Pakistan Cricket Board) त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून वसीमच्या यॉर्करचा व्हिडीओ शेअर केला. तो व्हिडीओ आता खूप वायरल होतोय.
निकोलस पूरनला यॉर्करवर केलं त्रिफळाचीत
वेस्टइंडीज विरुद्ध कराचीमध्ये झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात वसीमने भले ४० धावा दिल्या, पण त्याने ४ विकेट्ससुद्धा घेतल्या. वसीमच्या आक्रमक गोलंदाजीमुळे आणि यॉर्करच्या माऱ्यामुळे पाकिस्तानने वेस्टइंडीजला ६३ धावांनी हरवलं. त्याने गोलंदाजीला आल्यानंतर सुरुवातीलाच आपली कला दाखवली.
त्याने डावाच्या चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर वेस्टइंडीजचा कर्णधार निकोलस पूरनला (Nicholas Pooran) त्रिफळाचीत केले. तो चेंडू इतका जोरात गेला की पूरणने बॅट खाली आणेपर्यंतच चेंडू पुढे जाऊन ऑफ स्टंप सोबत घेऊन गेला.
https://twitter.com/TheRealPCB/status/1470417579302961162
वसीमच्या ४ पैकी ३ विकेट्स यॉर्करवर
मोहम्मद वसीम पहिल्या सामन्यात चांगल्या लयीत होता. त्याने त्याच्या दुसऱ्या षटकातसुद्धा जबरदस्त यॉर्कर टाकून डेवॉन थॉमसला (Devon Thomas) बाद केलं. थॉमस देखील पूरणसारखा बाद झाला. बॅट खाली आणेपर्यंत चेंडू त्याच्या बूटला लागला आणि पाकिस्तानी खेळाडू आणि वसीमने अपील करताच पंच अलीम डारने त्याला पायचीत बाद ठरवले.
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 13, 2021
वसीमने १९व्या षटकात सुद्धा जबरदस्त यॉर्कर टाकला. रोमारियो शेफर्डने (Romrio Shepherd) कशी बशी बॅटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटला लागून लेग स्टंपवर जाऊन आदळला. ओशेन थॉमसला (Oshane Thomas) बाद करत वसीमने आपली चौथी विकेट घेतली आणि संघाला विजय मिळवून दिला. २०० च्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्टइंडीजचा डाव १३७ धावांमध्येच गुंडाळला.
महत्त्वाच्या बातम्या-
- पीसीबी ‘या’ प्रकारच्या खेळपट्टीवर खर्च करणार तब्बल ३७ कोटी रुपये? जाणून घ्या काय खास कारण
- ‘या’ पाकिस्तानी फलंदाजाची बॅट ओकतेय आग! विराट-रोहितलाही न जमलेला विश्वविक्रम केलाय नावावर
- ना विराट… ना रोहित… ‘हा’ असणार भारताचा नवा कर्णधार? बीसीसीआय देणार मोठा धक्का?