पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 26व्या सामन्यात आमने-सामने आहेत. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार एडेन मार्करम याने जिंकली असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिका संघ विजयाची हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करेल.
या सामन्यात पाकिस्तान संघात दोन बदल झाले आहेत. हसन अली संघातून बाहेर पडला असून त्याच्या जागी मोहम्मद वसीम ज्युनिअर याला घेतले आहे. मोहम्मद नवाज याचेही पुनरागमन झाले आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका संघात तीन बदल आहेत. नियमित कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) संघात परतला आहे. तसेच, तबरेज शम्सी आणि लुंगी एन्गिडी यांचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच, रीझा हेंड्रिक्स, कागिसो रबाडा आणि लिजाद विलियम्स संघाबाहेर पडले आहेत.
स्पर्धेतील कामगिरी
दक्षिण आफ्रिका संघ सध्या विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्ये 8 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनी 5 सामने खेळले असून 1 सामन्यात पराभव, तर उर्वरित 4 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांना विजयाची हॅट्रिक करण्याची संधी आहे. दुसरीकडे, पाकिस्तान संघाने 5 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आहे, तर 3 सामने गमावले आहेत. ते गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहेत.
आफ्रिकेने पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध 102 धावांनी आणि दुसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 134 धावांनी जिंकला आहे. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्यांना नेदरलँड्सकडून 38 धावांनी पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर चौथ्या सामन्यात त्यांनी इंग्लंडला 229 धावांनी आणि पाचव्या सामन्यात बांगलादेशला 149 धावांनी पराभूत केले होते.
तसेच, पाकिस्तान संघाने स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने जिंकले होते. त्यांनी नेदरलँड्सला 81 धावांनी आणि श्रीलंकेला 6 विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर पाकिस्तानची गाडी रुळावरून खाली उतरली. त्यांना पुढील तिन्ही सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यांना भारताकडून 7 विकेट्सने, ऑस्ट्रेलियाकडून 62 धावांनी आणि अफगाणिस्तानकडून 8 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. आता या सामन्यात पाकिस्तान विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. (Pakistan have won the toss and have opted to bat against south africa)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, शादाब खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हरिस रौफ
दक्षिण आफ्रिका
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, जेराल्ड कोएट्झी, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एन्गिडी
हेही वाचा-
‘शाहिद आफ्रिदीने माझ्यावर इस्लाम धर्म…’, माजी पाकिस्तानी खेळाडूचा धक्कादायक आरोप
‘मी तर त्याच दिवशी निवृत्त झालेलो, पण…’, 3 वर्षांनंतर धोनीचा गौप्यस्फोट, सांगितली Retirementची खरी तारीख