आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील पाकिस्तान संघाचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला होता. पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला होता. संघाच्या खराब प्रदर्शनानंतर पाकिस्तान संघाला टीकेचा सामना करावा लागला. कर्णधार बाबर आझम याने तिन्ही क्रिकेट प्रकारातील कर्णधारपद सोडले. त्यानंतर शान मसूद याला कसोटीचा, तर शाहीन आफ्रिदी याला टी20 संघाचा कर्णधार बनवले. अशात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गोलंदाजी प्रशिक्षकांची जबाबदारी दोन माजी खेळाडूंवर सोपवली आहे. चला कोण आहेत ते दोन खेळाडू जाणून घेऊयात…
कोण आहेत ते दोन खेळाडू?
खरं तर, पाकिस्तान क्रिकेट (Pakistan Cricket) संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकांची जबाबदारी देण्यात आलेले दोन माजी खेळाडू इतर कुणी नसून उमर गुल (Umar Gul) आणि सईद अजमल (Saeed Ajmal) आहेत. या दोन्ही खेळाडूंनी पाकिस्तान संघासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर शानदार क्रिकेट खेळले होते. पीसीबीने या दोघांना ही जबाबदारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सोपवण्यात आली आहे.
उमर गुल याच्यावर वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी असेल. वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत पाकिस्तानची वेगवान गोलंदाजी फ्लॉप झाल्यानंतर पुन्हा लय पकडण्यासाठी खेळाडूंना खूप मेहनत करावी लागणार आहे. पीसीबीने अलीकडेच निवेदनात म्हटले होते की, 2009 टी20 विश्वचषक आणि 2012 आशिया चषक संघाचा सदस्य, तसेच पाकिस्तानचा माजी खेळाडू उमर गुल आणि सईद अजमल यांना अनुक्रमे वेगवान गोलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमले आहे.
Pakistan appoint veteran bowlers to take coaching roles in pace and spin department ⚡
More ⬇️https://t.co/O37Sn1OKxk
— ICC (@ICC) November 21, 2023
🚨 Umar Gul and Saeed Ajmal have been appointed as the Fast Bowling and Spin Bowling Coaches, respectively, for the Pakistan Men’s Team
Read more ➡️ https://t.co/0rPdPWlvGm pic.twitter.com/FB4sak7sFW
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 21, 2023
सईद अजमलवर लावली होती बंदी
खरं तर, संशयास्पद गोलंदाजी शैलीमुळे सईद अजमलवर बंदी लावली गेली होती. तो नेहमीच आपल्या ऍक्शनमुळे वादात राहिला आहे. सन 2014मध्ये त्याच्यावर बंदी घातली होती. त्याने पाकिस्तानकडून एकूण 35 कसोटी, 113 वनडे आणि 64 टी20 सामने खेळले आहेत.
उमर गुलची कारकीर्द
उमर गुल याने पाकिस्तान संघाकडून 2003मध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून 2016सालापर्यंत त्याने पाकिस्तानकडून 47 कसोटीत 163 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर 130 वनडेत त्याने 179 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, 60 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 85 विकेट्स घेतल्या आहेत. (pakistan men national team added two bowling coach know about them)
हेही वाचा-
वर्ल्डकपनंतर वॉर्नरने जिंकले 140 कोटी भारतीयांचे हृदय, मोठ्या मनाने माफी मागत म्हणाला…
ऑस्ट्रेलिया चॅम्पियन बनताच युजर्सनी दाखवली लायकी! क्रिकेटर्सच्या कुटुंबाला ट्रोल करताच भडकला हरभजन; म्हणाला…