आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये सुरु होणार आहे. विश्वचषकाला अवघे काही दिवस राहिले असताना स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाने एक लाजिरवाणे कृत्य केले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजमचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत बाबरने पाकिस्तान संघाची जर्सी घातलेली आहे आणि जर्सीवर विश्वचषक आयोजक भारत लिहिण्याऐवजी यूएई लिहिले गेले आहे. यानंतर आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
यावर्षी होणारा विश्वचषक भारतात खेळला जाणार होता, पण कोरोनाच्या कारणास्तव त्याचे आयोजन यूएई आणि ओमानमध्ये केले गेले आहे. विश्वचषक यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार असला तरी, त्याचे आयोजन बीसीसीआयनेच केले आहे. आयसीसीच्या नियमांप्रमाणे विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांना आयोजकांचे नाव त्यांच्या जर्सीवर लिहावे लागते.
परंतु पाकिस्तानने आयोजकांचे नाव न लिहल्याचे दिसत आहे. पाकिस्तानने त्यांच्या जर्सीवर ‘आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक भारत’ असे लिहिणे अपेक्षित होते. पण त्यांनी ‘आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक यूएई’ असे लिहिलेले दिसत आहे.
पाकिस्तानच्या कर्णधाराचे विश्वचषक जर्सीमधील फोटो व्हायरल झाले असले तरीही, अद्याप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृतपणे विश्वचषकासाठी त्यांच्या संघाची जर्सी लॉन्च केलेली नाही. यापूर्वी काही संघांनी त्यांची जर्सी लॉन्च केली आहे, यामध्ये स्कॉटलँड आणि नेदरलँड यांचा समावेश आहे. या दोन्ही संघांनी त्यांच्या जर्सीवर आयोजकांच्या रूपात भारताचे नाव लिहिले आहे. जर पाकिस्तान विश्वचषकात सध्या व्हायरल झालेल्या जर्सीसोबत सहभागी झाला, तर त्यांच्या अडचणी वाढू शकतात आणि आयसीसी त्यांच्यावर कारवाईही करू शकते.
🇵🇰 Unofficial Unveiling of Pakistan's #T20WorldCup2021 kit ft. National Skipper Babar Azam 💚#RateIt@T20WorldCup @TheRealPCB @babarazam258 pic.twitter.com/khMjiYCdGf
— Taimoor -(تیمور حسین)🇵🇰🇵🇰🇵🇰 (@Imran_emi1) October 7, 2021
दरम्यान, टी२० विश्वचषकाची सुरुवात १७ ऑक्टोबरला आणि अंतिम सामना १४ नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. पहिल्या दिवशी सामन्यात ओमान आणि पापुआ न्यू गिनी, तसेच बांगलादेश आणि स्कॉटलँड यांच्यात सामना होणार आहे. तसेच सुपर १२ फेरी २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारत त्यांच्या विश्वचषकातील आभियानाला २४ ऑक्टोबरपासून सुरुवात करणार आहे. पहिल्या सामन्यात भारतापुढे पाकिस्तानचे आव्हान असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मी रडू की हसू? राहुलचा क्लासिकल षटकार पाहून ब्रावोने दिली अशी प्रतिक्रिया, व्हिडिओ व्हायरल
चेन्नईच्या गोलंदाजांची दमछाक करत केएल राहुल बनला पंजाबची नवी ‘रनमशीन’, केला भीमपराक्रम