---Advertisement---

तब्बल ३३८ विकेट्स घेणाऱ्या ‘या’ भारतीय गोलंदाजांची अचानक निवृत्ती, मुंबई इंडियन्सचा राहिलाय माजी शिलेदार

On: शुक्रवार, ऑक्टोबर 8, 2021 9:43 AM
---Advertisement---

भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी  खेळलेला वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुनने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मिथुनने १२ हंगाम खेळल्यानंतर ही निवृत्तीची घोषणा केली आहे. मिथुनने भारतीय संघासाठी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिला सामना २०१० मध्ये खेळला होता. त्याने त्याचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतीय संघासाठी ४ कसोटी सामने खेळले आणि यामध्ये ९ विकेट्स घेतल्या. तसेच ५ एकदिवसीय सामनेही खेळले, ज्यामध्ये ३ विकेट्स मिळवल्या आहेत.

मिथुनने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत एकूण १०३ सामने खेळले आहेत आणि यामध्ये २६.६३ च्या सरासरीने ३३८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने ९६ लिस्ट ए आणि ७४ टी२० सामनेही खेळले, ज्यामध्ये एकूण २०५ विकेट्स मिळवल्या आहेत.

निवृत्तीची घोषणा करताना मिथुने सांगितले केले आहे की, “मी सर्वोच्च स्तरावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि ही माझी नेहमीच सर्वोच्च उपलब्धी राहील. यामध्ये मिळणारा आनंद आणि अभिमान ही अशी गोष्ट आहे, जी मी आयुष्यभर जपेल. क्रिकेट एक जागतिक खेळ आहे आणि मी याला सर्वोच्च स्तरावर समाप्त करू इच्छित होतो. स्वत:साठी जगातील चांगल्या संधी आणि कुटुंबासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला. मी हेदेखील स्पष्ट करतो की कर्नाटकात खूप प्रतिभाशाली वेगवान गोलंदाज आहेत आणि मी जर माझी कारकीर्द वाढवली, तर ते योग्य वेळी संधी गमावतील.”

https://twitter.com/imAmithun_264/status/1446121201575743488?s=20

मिथुन सुरुवातील थाळी फेक खेळाडू होता. पण नंतर तो क्रिकेटकडे वळला. त्याने श्रीलंकेविरुद्ध गॅलमध्ये त्याचा पहिला कसोटी सामना खेळला होता. तसेच याआधी पाच महिन्यांपूर्वी त्याने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध त्याचा पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. मिथुन आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या संघांसाठी एकूण १६ समने खेळला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

चेन्नईच्या गोलंदाजांची दमछाक करत केएल राहुल बनला पंजाबची नवी ‘रनमशीन’, केला भीमपराक्रम

आख्ख्या सीएसकेला एकटा राहुल पुरुन उरला, नाबाद ९८ धावा चोपत ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय बनला

मुंबईचा ‘रणजी धुरंधर’, ज्याने पाकिस्तानात जाऊन ठोकले होते पहिले प्रथम श्रेणी शतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---