---Advertisement---

आजपर्यंत कोणत्याच संघाला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये जमला नाही ‘तो’ वर्ल्डरेकॉर्ड पाकिस्तानने करुन दाखवला

On: रविवार, एप्रिल 11, 2021 8:30 PM
---Advertisement---

पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये टी२० मालिका खेळण्यात व्यस्त आहे. शनिवारी या मालिकेतील पहिला टी२० सामना पार पडला. हा सामना पाकिस्तानने ४ विकेट्सने जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयासह पाकिस्तानने मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.

पाकिस्तानचा हा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट प्रकारातील १०० वा विजय होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये १०० विजय मिळवणारा पाकिस्तान हा पहिलाच संघ ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही संघाला १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकता आले नव्हते. पाकिस्तानने आत्तापर्यंत १६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यातील १०० सामन्यांत विजय आणि ५९ सामन्यांत पराभव स्विकारले आहेत. तसेच ३ सामने बरोबरीत सुटले असून २ सामन्यांचा निकाल लागेलला नाही.

आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या यादीत पाकिस्तान पाठोपाठ भारत आहे. भारतीय संघाने आत्तापर्यंत १४२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना त्यातील ८८ सामन्यांत विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका प्रत्येकी ७१ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांतील विजयासह संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच त्यापोठापाठ इंग्लंड असून त्यांनी ६६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकले आहेत.

पाकिस्तानने जिंकला पहिला सामना 

शनिवारी झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १८८ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून ऍडेन मार्करनने ५१ आणि कर्णधार एन्रीच क्लासेनने ५० धावांची खेळी केली. तसेच पाकिस्तानकडून मोहम्मद नवाज आणि हसन अलीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर प्रतिउत्तरादाखल फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानकडून यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या मोहम्मद रिझवानने ५० चेंडूत नाबाद ७४ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तसेच फाहिम अश्रफने १४ चेंडूत आक्रमक ३० धावा केल्या. पाकिस्तानने १८९ धावांचे आव्हान १९.५ षटकांत ६ विकेट्सच्या मोबदल्यात यशस्वी पार केले.

महत्त्वाच्या बातम्या – 

जमाईका टू इंडिया! आयपीएलदरम्यान ख्रिस गेलचे रॅप साँग झाले प्रदर्शित, इंटरनेटवर व्हिडिओ घालतोय धुमाकूळ

हे आहेत सनरायझर्सचे ‘जबरा फॅन’, वॉर्नरने शेअर केली छायाचित्रे

जेव्हा २५ वर्षांपूर्वी वेंकटेश प्रसाद पाकिस्तानी क्रिकेटरला म्हटला होता ‘मी इंदिरानगरचा गुंडा आहे’, ट्विट होतय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---