---Advertisement---

दौरा रद्द झाल्यानंतर पाकिस्तानच्या रावळपिंडी मैदानावर दिसले ‘असे’ दृश्य, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

On: शनिवार, सप्टेंबर 18, 2021 2:16 PM
---Advertisement---

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये १७ ऑक्टोबरपासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार होता. १७ ऑक्टोबर रोजी रावळपिंडीच्या मैदानावर पहिला वनडे सामना पार पडणार होता. परंतु सामना सुरू होण्याच्या २ तासांपूर्वीच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सुरक्षेच्या कारणास्तव ही मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा दौरा रद्द केल्यानंतर पाकिस्तान सुरक्षा आणि बॉम्बविरोधी पथक रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर तपास करताना दिसून आले.

या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडणार होती. ही मालिका सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंडची प्रधानमंत्री जेसिंडा अर्डर्न यांनी न्यूझीलंड संघावर हल्ला होण्याची भीती दर्शवली होती. दरम्यान पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान यांनी जेसिंडा अर्डर्न यांना आश्वासन दिले होते की, या मालिकेदरम्यान सुरक्षेचा कोणताही धोका नसेल.

यावर इमरान खान यांना प्रत्युत्तर देत जेसिंडा अर्डर्न यांनी म्हटले की, “आम्ही हॉटेलमधून बाहेर पडल्यावर आमच्या टीमवर हल्ला होऊ शकतो अशी बातमी आहे.”

अखेर न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे सुरक्षा कर्मचारी आणि बॉम्बविरोधी पथक रावळपिंडी क्रिकेट मैदानावर दिसून आले होते. या दरम्यान, सुरक्षा जवानांनी मैदानाचा तपास केला. परंतु आतापर्यंत हल्ल्याबाबतची कुठलीही माहिती मिळाली नाहीये. न्यूझीलंड संघ १८ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये मालिका खेळण्यासाठी गेला होता. वनडे मालिकेतील सर्व सामने रावळपिंडीच्या मैदानावर खेळले जाणार होते. वनडे मालिका झाल्यानंतर टी-२० मालिकेतील सर्व सामने लाहोरच्या स्टेडियममध्ये पार पडणार होते.

असे होते न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान मालिकेचे स्वरूप
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – (१७ सप्टेंबर, रावळपिंडी)
२)दुसरा वनडे सामना – (१९ सप्टेंबर, रावळपिंडी)
३)तिसरा वनडे सामना – (२१ सप्टेंबर, रावळपिंडी)

टी -२० मालिका 
१) पहिला टी -२० सामना – (२५ सप्टेंबर,लाहोर)
२)दुसरा टी -२० सामना – (२६ सप्टेंबर, लाहोर)
३) तिसरा टी -२० सामना – (२९ सप्टेंबर, लाहोर)
४) चौथा टी -२० सामना – ( १ ऑक्टोबर, लाहोर)
५) पाचवा टी -२० सामना – ( ३ ऑक्टोबर, लाहोर)

महत्त्वाच्या बातम्या-

अगग! पाकिस्तानचे इंग्रजीचे वांदे, ‘आम्ही न्यूझीलंडसाठी Fool प्रुफ नियोजन केले’ म्हणत झाले ट्रोल

इंजमामचे ‘आलू प्रकरण’ व गांगुलीच्या तुफानी कामगिरीसाठी कायम लक्षात राहिलेली वनडे मालिका

दौरा रद्द केल्याने संतापले रमीज राजा, न्यूझीलंड बोर्डाला दिली धमकी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---